आपल्या असण्याला शब्दात रेखाटणे तसे अवघड काम.
साहित्यिक चौकटींमध्ये रचणे,त्याहून अवघड उदयोग.
जुन्नर , निसर्गाने अभूतपूर्व सौंदर्याची उधळण केलेला, पाच धरणे,शिवनेरी सह सात गड, किल्ले, सातवाहन काळातील अजरामर खूणा , बौद्ध लेण्या ,जगविख्यात महादुर्बिन ,देशातील पहिले दळणवळण केंद्र, राष्ट्रपती पदक विजेती लावणीसाम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर हिच्या कलेने आणि वरील बाबींच्या संगतीने जगण्यात जुंद्री ठसका मुरवलेल्या अतरंगी माणसांचा हा सह्याद्रीच्या कुशीतला प्रदेश.
या भोवतालच्या खाणा-खुणा, माणसे आणि घटना यांचा मोठा संचय केलेल्या माझ्यासाठी पुणे एक नवी दुनिया होती.
या भोवतालच्या खाणा-खुणा, माणसे आणि घटना यांचा मोठा संचय केलेल्या माझ्यासाठी पुणे एक नवी दुनिया होती.
पुणे. साहित्य, इतिहास, कला, बहुसांस्कृतिक- राजकीय उलाढालींचे केंद्र असलेले शहर. इथे आयुष्याची नवी इनिंग खेळायला आलेलो मी अनेक घटना, बाबी आणि सामाजिक वास्तवाची मांदियाळी अनुभवायला मिळत आहे . माझ्यातील लेखक टीपकागदासारखा हे जगत आहे . अभ्यासक्रम सुरु असताना जगभरात अनेक उलाढाली घडत आहेत.
लेखणीला धार येत आहे . सोशल मिडिया, ऑनलाईन पत्रकारितेचा खूप मोठा विस्तार वाढत आहे.
तेंव्हा ‘पहिली घंटा ’हा मराठी साहित्य, राजकारण आणि सांस्कृतिक उलाढालींवर ‘क्ष-किरण’ टाकणारा ब्लॉग मी मैत्र- मैत्रीण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केला.
आज या ब्लॉगवरील लेखाचे जगभरातील मराठी वाचक आहेत. याचा खूप अभिमान आणि आनंद वाटत आहे.
जे जे मला माझ्या लेखणीला शाबासकी देत आहे त्यांचे मनापासून आभार
“जगाच्या तुलनेत देश लहान. देशाच्या तुलनेत एकटामाणूस लहान. समूहांच्या तुलनेत एकटा माणूस लहान. या लहान एकटेपणातून आलेल्या फालतूपणाचं काय करायचं? मुंगी आकाराने छोटी असते पण ती तुमच्या ढुंगणाला चावू शकते. ...तुम्ही तिच्या ढुंगणाला चावू शकता का? नाही ना? म्हणून कुणालाही कमी लेखू नये.”
माझ्या लेखणीला आणखी नवनवे धुमारे फुटोत,या शुभेच्छारुपी आशीर्वाद देणाऱ्या सर्व हीतचिंतक यांच्या शुभेच्छांचे चीज केल्याशिवाय फुलस्टाँप घेणार नाही.
अतिसुंंदर.
ReplyDeleteधन्यवाद DL
ReplyDeleteधन्यवाद DL
ReplyDeleteMast depya
ReplyDeleteThanks aappe
ReplyDeleteThanks aappe
ReplyDelete