माणूस किती जगला याला मोल नाही त्याच्या जगण्याचा मातृभूमीला किती उपयोग झाला याला मोल आहे. मृत्यूनंतर सुद्धा ज्यांच्या स्मृती दुनिया जतन करून ठेवते, ज्यांच्यासाठी आसू ढाळते ते खरे मृत्यूंजय ...
जम्मू काश्मीर मधील नागरोटा सांबा सेक्टर येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत पंढरपूरचे शहीद मेजर कुणाल गोसावी हे पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयात असताना एनसीसी विभागात जवळून अनुभवणारी आणि त्यांची महाविद्यालयीन मैत्रीण तेजाली शहासने हिने त्यांच्या काही आठवणींना उजाळा दिला. तिने त्यावर लेख हि लिहले. त्यांच्या मैत्रीत मी हि सामील झालो. आणि तिच्या काही लेखांचा अभ्यास करून मी लेखणी हातात घेतली.

संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या मते त्या हल्ल्यानंतर पाकिस्तान कोमात गेले. हे ऐकण्यास नक्कीच गोड असले आणि तशाच आभासी गोडव्यात रमणे आपल्याकडील समाजमाध्यमांपुरत्या राष्ट्रवाद्यांना पसंत असले, तरी वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. पुन्हा लक्ष्यभेदी हल्ले करा, अशी मागणी लोकप्रिय होत असताना ती वस्तुस्थिती आधी लक्षात घेतली पाहिजे. लक्ष्यभेदी हल्ल्यानंतर भारतावर लहानमोठे २० दहशतवादी हल्ले झाले असून, त्यांत सुमारे २४ जवान शहीद झाले आहेत. नगरोटा तळावरील हल्ला त्यापैकी मोठा. हे नक्कीच दीर्घबेशुद्धीत गेलेल्या देशाचे लक्षण नाही. मात्र स्वत:चेच ढोल वाजवण्यात मश्गूल असलेल्या संरक्षणमंत्र्यांना हे सांगणार कोण? ते निवडणूक प्रचाराच्या सभेत, पाकिस्तानने आमच्याकडे वाकडय़ा नजरेने पाहिले तर त्याचे डोळे काढून हातात देऊ, अशा वल्गना करण्यात मग्न आहेत. हे एक तर मंत्र्यांचे वास्तवापासून तुटणे आहे किंवा तो जनतेला वास्तवापासून तोडण्यासाठी चालविलेला प्रचार आहे. वास्तविक लक्ष्यभेदी हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कर चवताळून अंगावर येणार हे सांगण्यासाठी कोणा थिंकटँकची आवश्यकता नव्हती. त्यासाठी भारतीय लष्कराने सज्ज असणे आवश्यक होते. ही सामान्यज्ञानाची गोष्ट आहे. परंतु तसे झालेले नाही हेच नगरोटा हल्ल्यातून पुन्हा एकदा दिसून आले आहे. असा हल्ला होणार असल्याची पूर्वसूचना गुप्तचरांनी देऊनही तो झाला. तो टाळणे तर दूरच, दहशतवादी सीमेपलीकडून सुमारे ४० किलोमीटर आत येऊन थेट लष्करी छावणीत घुसले. अक्षम्य निष्काळजीपणाखेरीज हे घडणे शक्य नव्हते. या हल्ल्यात दोन अधिकाऱ्यांसह सात जवानांना आपले प्राण गमवावे लागले. त्याची जबाबदारी सुरक्षेबाबतच्या या बेफिकिरीवर असल्याचे मान्य केले, तरच त्यावर उपाययोजना करता येतील. सुमारे अडीच हजार किलोमीटरची भारत-पाक सीमा सीलबंद करणे अशक्यप्राय आहे याबाबत दुमत नाही. परंतु केवळ या नाइलाजावर खापर फोडून चालणार नाही. आधुनिक तंत्रज्ञानामार्फत सीमेवर जागता पहारा ठेवणे ही सुरक्षेसाठीची मूलभूत उपाययोजना. ते करणे दूरच, परंतु आपण आपल्या लष्करी तळांची सुरक्षाव्यवस्थाही अभंग ठेवू शकत नसल्याचे दिसत आहे. उरीमध्ये काही जवान मृत्युमुखी पडले ते तंबूंना दहशतवाद्यांनी लावलेल्या आगीमुळे. सीमेनजीकच्या तळांवरील तंबू किमान अग्निरोधक कापडाचे असावेत याची काळजीही आपण घेऊ शकलो नाही, की अॅसॉल्ट रायफल, बुलेटप्रूफ जाकिटे अशा जवानांच्या गरजाही भागवू शकलेलो नाही. तेव्हा राष्ट्रवादाच्या लाटेवर स्वार होऊन सरकारला ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही आणि आधीच्या सरकारांची नालायकी पुढे करून आपल्यावरील जबाबदारीही झटकता येणार नाही. परंतु पुन्हा एकदा तसेच प्रकार सुरू असल्याचे दिसत आहेत. देशामध्ये पुन्हा एकदा समाजमाध्यमांतून राष्ट्रवादाचा अतिरेकी ज्वर फैलावला जात आहे.
आधुनिक तंत्रज्ञानामार्फत सीमेवर जागता पहारा ठेवणे ही सुरक्षेसाठीची मूलभूत उपाययोजना. बुलेटप्रूफ जाकिटे, अग्निरोधक तंबू यांची गरज ओळखण्याऐवजी आपण शत्रुराष्ट्र कोमात गेल्याची भाषा करीत आहोत..
अशा सततच्या संघर्षरततेतून नागरिकांना एका आभासी वास्तवाकडे नेण्याचा हा प्रकार असून, सरकारांचे प्रचारी प्रतिपादन आणि ‘खरी’ वस्तुस्थिती यांतील भेद ओळखण्याची क्षमताही लोकांनी गमावल्याचे भयकारी चित्र देशभरात उमटताना दिसत आहे. लष्करी व्यवस्थेने जसे पाकिस्तानी हल्ले रोखण्यासाठी अधिक जागे राहण्याची आवश्यकता आहे, तशीच जागरूकता नागरिकांनीही आभासी वास्तवात वाहून न जाण्यात दाखविली पाहिजे. सीमेवरील जवानांसाठी, देशातील त्यांच्या कुटुंबीयांसाठी तरी आपण एवढे करणे लागतो.
मेजर साहेब तुम्ही देहाने जरी आम्हाला सोडून गेले असले तरी हृदयात नक्की आहात.
शहीद मेजर कुणाल गोसावी
अमर रहे , अमर रहे !

No comments:
Post a Comment