Saturday, 28 January 2017

पेटावाल्यानो घोडा लागतो मग बैल का नाही

बैलगाडा शर्यतींवर बंदी का ?
आपण व्यायाम करतो, आपण सकाळी फिरायला जातो. पण आम्हा शेतकऱ्यानां अशा वेगळ्या व्यायामाची गरज पडत नाही. कारण तो अखंड कष्ट करीत असतो. बैल पोळा, बैल गाडा शर्यत, जत्रा – यात्रा, कुस्त्या, तमाशा हि त्याची करमणुकीची साधनं आहेत. त्याच्यासाठी कुठेहि सिनेमा नसतो, टि व्ही नसतो, चेंडू फळीचा खेळ नसतो. मग का कुणी असं त्याच्या आयुष्यात नाक खुपसाव ? जशा आपण धावण्याच्या शर्यती खेळवतो तशाच या शर्यती. त्यावर कुणी अक्षेप घ्यावं असं त्यात काय आहे ?
शिवाय अशा स्पर्धा बैलांमधली कामाची रग टिकवून ठेवायला मदतच करतात. ” माणसानं त्याच्या शेपटीचा वापर करायच सोडून दिलं म्हणून त्याची शेपटी नाहीशी झाली ” असं म्हणतात. बैलांला त्रास होऊ नये म्हणून त्यांच्यावर कमी ओझं लादायला सुरवात केली आणि उद्या त्यांची ओझं वहाण्याची ताकद कमी झाली तर बैलगाडी कोण ओढणार ? नांगराला  कुणाला जुंपायच ?(विरोध करणाऱ्यांना का ?)
आमची शहरी मंडळी म्हणतात ट्रॅक्टर वापरावा. पण पोटापुरती चार दोन एकर शेती असणाऱ्या आमच्या शेतकरी बांधवाना ते धूड सांभाळण परवडणार आहे का ? शिवाय अशा जनावरांपासून मिळणाऱ्या आणि शेतीसाठी सर्वत्कृष्ठ ठरणाऱ्या खताच काय ? तेव्हा माझी तमाम पुस्तकी विद्वानांना हात जोडून विनंती आहे कि त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवावर बेतेल अशा रितीनं त्याच्या जिवनात नाक खुपसू नये.
दिनांक २४-१-२०१७ .लोकसत्ता या राष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्रातली बातमी..
" बैलगाडी शर्यती चालू करण्याची मुख्यमंत्र्यांची निवडणुकांपूर्वी राजकीय खेळी ? "
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्राच्या जनतेचे केंद्रातील प्रतिनिधी आहेत.
कोणत्याही समस्या ज्या स्थानिक लोकांना आहेत त्या ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर  मांडणार नाही तर काय तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांसमोर  मांडणार आहेत ?
बैलगाडी शर्यत महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा विषय आहे..आणि त्यात  शेतकऱ्याचा कोणताही राजकीय हेतू नाही..
फार पूर्वापासून चालू असलेल्या शर्यतीच्या परंपरेला जेव्हा कोर्टाने  लगाम घातला तेव्हा हे स्थानिक वृत्तपत्र कुठे होते ? शेतकऱ्यांची बाजू त्यांनी मांडली का ? त्याच्या  वृत्तपत्रात छापली का ?
मग आता जेव्हा जल्लीकट्टू च्या आधारावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा ह्या गोष्टीचा विचार करत आहेत, त्या विचारांना, शेतकऱयांना मिळणाऱ्या पाठिंब्याला राजकीय खेळी बोलणं कितपत योग्य आहे ?
प्रत्येक राज्यातली स्थानिक वृत्तपत्र हि तेथील जनतेला पाठिंबा देण्यासाठी किंवा त्यांच्या समस्या  मांडण्यासाठी असतात..
ह्याचा विसर पडलाय असं वाटतंय..पर्यावरणाच्या ऱ्हास करून मोठ्या इमारती बांधणाऱ्या व्यावसायिकांच्या जाहिराती ह्यांच्या पहिल्या पानावर असतात.तेव्हा त्या पर्यावरणाचा पुनर्वसन करायचा लेख कोणी छापत नाही.
आणि ह्याच बाबतीत आम्हाला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तामिळनाडूच्या जनतेचा हेवा वाटतोय.
त्यांनी जल्लीकट्टू साठी केलेल्या आंदोलनांत तिथे प्रत्येक न्युज वाले आणि वृत्तपत्र त्यांच्या बाजूने  लढत होते..परंपरा टिकवण्यासाठी...
आज जर  मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत आहेत तर त्यात राजकीय खेळी कुठून आली ? जर तुम्ही शेतकऱ्यांच्या बैलगाडा शर्यती सोबत नसाल तर कमीत कमी असे लेख छापून वातावरण दूषित करू नका..
शेतकऱ्यांविषयी, त्याच्या जनावरांविषयी खरंच कुणाला खूप सहानभूती वाटत असेल तर त्यांनी शेतमालाला चांगला भाव मिळावा म्हणून, अडते आणि दलाल यांच्यामुळे शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबावी म्हणून धडपड करावी.
    तुमचा दिप्या 
 (कधी कधी कॉलेजला दांडी मारून बैलगाडा शर्यतीला जायचो )

3 comments:

  1. Khuuuupach chan dipak
    Pan mala watat ki sharyat asavi pan rag maranyasathi ji daru pajali mate te yogya nahi as manapasun watat

    ReplyDelete
  2. ठीक आहे ...यात काही नियम केले आहेत
    आणि एखाद्याने केले असेल
    आहो जिवापलीकडे जपतात मग सगळेच शेतकरी करतात हे मान्य नाही

    ReplyDelete
  3. बैल गड शर्यत आणि जल्लिकटू यात खूप मोठा फरक आहेच ज्या प्रमाणे तामिळनाडू सरकारने विधेयक आणून त्याचे कायद्यात रूपांतर करून घेतले. महाराष्ट्र सरकार हि अश्या प्रकारे कायद्या मध्ये बदल करू शकते पण मुळात सरकारची तशी मानसिकता दिसत नाही.मागण्या पूर्ण कारण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येते...

    ReplyDelete