Tuesday, 31 January 2017

देशाला न लाभलेले असे दोन "पंतप्रधान"

नेताजी मुलायमसिंह यादव आणि शरद पवार साहेब या दोन नेत्यांमध्ये साम्यस्थळे काय आहेत? त्यांची तुलना होऊ शकेल की नाही? दोघांच्या नेतृत्वशैलीत फरक काय आहेत?
दोघांना कायमचे भावी पंतप्रधान म्हटले जाते. यात कौतुकाचाही भाग असतो, अनेकदा उपहासानेही त्यांचे विरोधक या वस्तुस्थितीचा वापर करतात. वयाच्या हिशेबाने मुलायमसिंह पवारांपेक्षा काही महिन्यांनी थोरले आहेत. गेली ५० वर्षे हे दोघेही देशाच्या जनमाणसावर स्वत:चा ठसा उमटवत आलेले आहेत. त्या निमित्ताने या लोकनेत्यांच्या राजकारणाविषयी चर्चा सुरू आहे. फळे लागलेल्या झाडाकडे काळजीने, मत्सराने पाहण्याची आपल्याकडची रीत आहे. दोघेही त्यांच्या त्यांच्या राज्याचे तीनदा मुख्यमंत्री होते. दोघांचीही मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द गाजली, वाजली आणि वादग्रस्तही ठरली. दोघेही देशाचे संरक्षणमंत्री होते. दोघांनीही पंचाहत्तरी धुमधडाक्यात ओलांडली आहे.  त्यानिमित्ताने हा लेखप्रपंच
......…........................................................................
मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, म्हणून महाराष्ट्राला देशाचे आर्थिक इंजिन म्हणता येईल. उत्तर प्रदेश म्हणजे छोटा भारत . हे राज्य देशाच्या राजकारणाला दिशा देते. देशाचा पंतप्रधान ठरवते. दिल्लीचे तख्त कुणाच्या ताब्यात असणार हे उत्तर प्रदेश ठरवतो. या अर्थाने हे राज्य देशाचे राजकीय इंजिन आहे. म्हणूनच अशा या दोन राज्यांतील मोठा जनाधार असणाऱ्या या दोन नेत्यांविषयी देशभर सतत कुतूहल राहिलेले आहे.

  • या दोन्ही नेत्यांची राजकीय जडणघडण १९६० च्या दशकात झाली. हा काळ देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. देश नुकताच स्वतंत्र झाला होता. सर्वांना स्वराज्याचे सुराज्य करण्याचे वेध लागले होते. दारिद्र्य, अज्ञान, गुलामीतून बाहेर पडण्याची भूक साऱ्या समाजालाच लागली होती. देशात सुराज्य आणायचा रस्ता म. गांधींनी दाखवला होता. पं. नेहरू यांच्या नेतृत्वाखाली देश सुराज्याकडे वाटचाल करत होता. अशा वेळी बहुजन समाजातून, मध्यम जातीतून कर्तबगार तरुणांची एक पिढी जीवनाच्या विविध क्षेत्रांत पुढे येत होती. या पिढीचे नेते म्हणून शरद पवार आणि मुलायमसिंह पुढे आले. या दोघांनाही सामाजिक चळवळींची पार्श्वभूमी आहे. समाज अस्वस्थ होता. काळ गतीमान होता. त्यात या दोघांच्या जीवनाला दिशा मिळाली.


  1. मुलायमसिंह हे उत्तर प्रदेशातल्या इटावा जिल्ह्यातल्या सैफई या गावातला, यादव जातीतला, शेतकरी कुटुंबातला मुलगा. एम.ए.,बी.टी. झाला. शिक्षक म्हणून काम करू लागला. त्याला कुस्तीची आवड होती. कुस्तीने त्याला जीवनात पुढे जायला रग, धमक दिली. शिक्षणाने विचार दिला. हा तरुण समाजवादी विचारवंत डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या सहवासात आला. लोहिया हे गांधींचे शिष्य. समाजवादाला त्यांनी भारतीय चेहरा दिला. भारतीय समाजातल्या जात या शोषण माध्यमाकडे त्यांनी लक्ष वेधले. जातिव्यवस्था निर्घृण असून तिने केवळ इथल्या माणसांना गुलामच केले नाही, तर त्यांच्यातली सर्व निर्मितीक्षमता चिरडून, छाटून मारून टाकली याची प्रभावी मांडणी लोहियांनी केली. समाजवादाला त्यांनी जातिनिर्मूलनाची जोड दिली. जातीचे चटके सोसलेल्या मुलायमसिंहांना हा विचार झपाटून टाकणारा होता. ते लोहियांचे शिष्य, समाजवादी बनले. सामाजिक न्यायाच्या चळवळीत सक्रिय कार्यकर्ते झाले. समाजात सर्व प्रकारची समता आणण्यासाठी झटण्याचे त्यांनी ठरवले. उत्तर प्रदेश या राज्यात जातव्यवस्थेचे जाळे तर जास्तच गुंतागुंतीचे आहे. उच्चजातीयांच्या उलट्या कर्तबगारीचे तिथले किस्से भयावह आहेत. दबलेल्या जातींना गुलामासारखे वागवण्याची तिथली अनेक उदाहरणे ऐकताना अंगावर काटे उभे राहतात. अशा राज्यात कार्यकर्ता म्हणून मुलायमसिंहांना काम करायचे होते. घरात वारसा नव्हता, विचार हीच प्रेरक शक्ती होती. कुस्तीची आवड असणाऱ्या या पैलवानाने विषमतेविरोधात शड्डू ठोकला.        
  2. या उलट शरद पवारांच्या आई (शारदाबाई गोविंदराव पवार) डाव्या विचारांच्या कार्यकर्त्या होत्या. घरात मार्क्स, लेनिन यांचे फोटो होते. लाल झेंड्याचा परिचय होता. समतेचे विचार लहानपणापासून माहीत होते. काटेवाडी या गावानेच बालवयात पवारांना समतेचा परिचय दिला होता. पवारांना पुण्यासारख्या प्रगत विचारांच्या शहरात शिकायची संधी मिळाली. विद्यार्थी असताना त्यांना यशवंतराव चव्हाणांसारखा नेता जवळून पाहायला मिळाला. चव्हाण मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांनी प्रभावीत झालेले. त्यांनी समाजवादाचा व्यवहारीदृष्ट्या सोयीचा आविष्कार असलेल्या सहकाराची कास धरली. सहकारातून समाजवादाकडे हा विचार अंगीकारला. पवारांना घरातल्या समाजवादाने भुरळ घातली नाही, तेवढी या व्यवहारी, उपयुक्त सहकाराने घातली. आज बारामतीत जे विकासाचे बेट उभे राहिले ते सहकारातूनच आकाराला आले आहे. सामाजिकदृष्ट्या पवारांचे विचार पुढारलेले आहेत. यशवंतराव जात मानत नव्हते, पण त्यांना मराठा समाजाचा नेता म्हणून मान्यता मिळाली. पवारही जात मानत नाहीत, पण त्यांचा उल्लेखही मराठा नेता असाच सतत केला जातो. दिल्लीत तर तो जास्त ठळकपणे होतो. पवारांनी अठरापगड जातींना बरोबर घेतले. सर्वच जातीतून नवे नेते घडवले. म्हणून राज्यातल्या छोट्यामोठ्या ओबीसी-दलित-आदिवासी-भटक्याविमुक्त समूहात पवारांविषयी प्रेम आहे. मराठा समाजानेही पवारांवर जीव लावला. या शिदोरीमुळेच त्यांना मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे करता आले. महिलांना सत्तेचा वाटा देता आला. मंडल आयोगाची प्रभावी अंमलबजावणी करता आली, मुस्लीम ओबीसींना सवलती मिळवून देता आल्या. त्यातून पवारांची प्रतिमा एक सामाजिक न्यायवादी नेता अशी उभी राहिली.

मुलायमसिंह यांनी त्यांच्या नेतृत्वाच्या जोरावर मंडल आयोग, धर्मनिरपेक्षता, राखीव जागा हा अजेंडा पुढे रेटला. बाबरी मशीदविरोधी आंदोलन हाताळले. आज समाजवादी पक्षात उत्तर प्रदेशातल्या आठरापगड जातीतले नेते पुढे आलेले दिसतात. सुरुवातीच्या काळात मुलायम आणि कांशीराम यांचा बहुजन समाज पक्ष हातात हात घालून पुढे आले. दोघांचे अजेंडे एकसारखे असल्याने दोघांनाही त्यातून बळ मिळाले. हे दोन्ही पक्षच आज उत्तर प्रदेशचे तारणहार बनले आहेत. संघ परिवाराची नकारात्मक, समाजात दुही पेरणारी आंदोलने या राज्यात सतत सुरू असतात. ती निष्प्रभ करण्याचा फॉर्म्युला मुलायमसिंह यांनी मध्यम जातीच्या एकजुटीतून तयार केला आहे. त्या राज्यात मुस्लीम बांधव त्यांना मोठा भाऊ मानतात. ही त्यांच्या नेतृत्वाची मोठी विश्वासार्हता म्हणता येईल. ही विश्वासार्हता त्यांनी सतत केलेल्या सोशल इंजिनिअरिंगमधून तयार झाली आहे. म्हणून सारेजण त्यांना नेताजी म्हणतात. हे दोन्ही नेते ५० वर्षे आपापल्या राज्याचे नेतृत्व करत आले आहेत. पन्नास वर्षांच्या वाटचालीत या दोघांनी अनेक प्रश्न सोडवले. अनेक आव्हाने परतवून लावली. त्याबद्दल लोकांनी त्यांच्या कर्तबगारीला सलाम केला. मुलायमसिंहांना लोकांनी नेताजी ही पदवी दिली, तसे पवारांना महाराष्ट्र जाणता राजा म्हणून संबोधतो. असे असामान्य झालेल्या नेत्यांकडून लोकांच्या अपेक्षाही तेवढ्याच वाढतात. लोक या नेत्यांबद्दल जास्त पझेसिव्ह होतात. त्यांच्यावर जास्त जबाबदारी लादतात.
त्या भावनेतूनच महाराष्ट्रात पवारांकडे जास्त अपेक्षेने पाहिले गेले. एवढा मोठा महानेता आपल्याजवळ असताना राज्यातल्या असहाय्य शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू शकल्या नाही, असे विश्लेषण केले गेले. शेतकरी मराठा समाजातले दारिद्र्य दिवसेंदिवस वाढतेय. त्या समाजातल्या तरुण वर्गात रोजगार संधीचा अभाव असल्याने मोठा असंतोष खदखदतोय. या राज्यातली शेती, ग्रामीण समाज, गावगाडा जवळपास शेवटचे आचके देत आला दिवस ढकलतोय. तो केव्हाही मोडून पडेल अशी स्थिती आहे. या पडझडीत सर्वात जास्त झळ मध्यमजातींना पोचणार आहे. पवारांसारखा जाणता नेता आपल्याजवळ असताना हे होते आहे याची बोच आहे. हा काळाचा घाला असेल पण त्यावर काहीच उपाय नाही काय? पवारांनी या अरिष्टात हस्तक्षेप करावा, यासाठी लोक आशाळभूतपणे त्यांच्याकडे पाहत आहेत. शिक्षण, आरोग्य या व्यवस्थाही आजारी आहेत. लोक त्यात भरडले जाताहेत. राज्यातले सरकारही या प्रश्नांकडे गांभीर्याने बघत नाही.
अशीच भीषण परिस्थिती उत्तर प्रदेशातही आहे. रोजगाराचा अभाव, शेती अरिष्ट, शिक्षण, आरोग्य व्यवस्थेचे रोगटपण याचा सामना का करत नाही म्हणून लोक मुलायमसिंहांना दोष देत आहेत. या रोगटपणातून गुन्हेगारी, भ्रष्टाचाराचा महारोग फोफावतो. असहिष्णुता धगधगते, धर्माची गिधाडे झेपावतात. दंगली होतात, दादरी कांड होते, गुन्हेगारी वाढते ही या रोगट व्यवस्थेची देण आहे.

शरद पवार-मुलायम सिंह हे काही फक्त त्या त्या राज्याचे नेते नव्हेत. ते देशाचे नेते आहेत. देशाला पुढे नेणाऱ्या दोन महत्त्वाच्या राज्यात त्यांना मान्यता आहे. या दोन राज्यांच्या समस्या या साऱ्या देशाच्याच आहेत. त्या सुटल्या नाहीत तर देशाचा गाडा अडेल. पंचाहत्तरी हे निमित्त. या निमित्ताने देशापुढच्या या आव्हानांना भिडण्याचा विचार या नेत्यांनी द्यावा, यासाठी लोक या दोघांच्या राजकारणाच्या उण्यादुण्यावर चर्चा करत आहेत. फळ लागलेल्या झाडावर दगड मारावाच लागतो. आपली ती परंपराच आहे!
 ( नुकताच शरद पवार साहेबांना भारत सरकारचा दुसऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार "पद्मविभूषण" ने सन्मानित करण्यात आले. याचा अभिमान सर्व शेतकऱ्यांला आहेच.या विषयी लेख लवकरच पाहूयात ) 
 तुमचा दिप्या 

Saturday, 28 January 2017

पेटावाल्यानो घोडा लागतो मग बैल का नाही

बैलगाडा शर्यतींवर बंदी का ?
आपण व्यायाम करतो, आपण सकाळी फिरायला जातो. पण आम्हा शेतकऱ्यानां अशा वेगळ्या व्यायामाची गरज पडत नाही. कारण तो अखंड कष्ट करीत असतो. बैल पोळा, बैल गाडा शर्यत, जत्रा – यात्रा, कुस्त्या, तमाशा हि त्याची करमणुकीची साधनं आहेत. त्याच्यासाठी कुठेहि सिनेमा नसतो, टि व्ही नसतो, चेंडू फळीचा खेळ नसतो. मग का कुणी असं त्याच्या आयुष्यात नाक खुपसाव ? जशा आपण धावण्याच्या शर्यती खेळवतो तशाच या शर्यती. त्यावर कुणी अक्षेप घ्यावं असं त्यात काय आहे ?
शिवाय अशा स्पर्धा बैलांमधली कामाची रग टिकवून ठेवायला मदतच करतात. ” माणसानं त्याच्या शेपटीचा वापर करायच सोडून दिलं म्हणून त्याची शेपटी नाहीशी झाली ” असं म्हणतात. बैलांला त्रास होऊ नये म्हणून त्यांच्यावर कमी ओझं लादायला सुरवात केली आणि उद्या त्यांची ओझं वहाण्याची ताकद कमी झाली तर बैलगाडी कोण ओढणार ? नांगराला  कुणाला जुंपायच ?(विरोध करणाऱ्यांना का ?)
आमची शहरी मंडळी म्हणतात ट्रॅक्टर वापरावा. पण पोटापुरती चार दोन एकर शेती असणाऱ्या आमच्या शेतकरी बांधवाना ते धूड सांभाळण परवडणार आहे का ? शिवाय अशा जनावरांपासून मिळणाऱ्या आणि शेतीसाठी सर्वत्कृष्ठ ठरणाऱ्या खताच काय ? तेव्हा माझी तमाम पुस्तकी विद्वानांना हात जोडून विनंती आहे कि त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवावर बेतेल अशा रितीनं त्याच्या जिवनात नाक खुपसू नये.
दिनांक २४-१-२०१७ .लोकसत्ता या राष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्रातली बातमी..
" बैलगाडी शर्यती चालू करण्याची मुख्यमंत्र्यांची निवडणुकांपूर्वी राजकीय खेळी ? "
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्राच्या जनतेचे केंद्रातील प्रतिनिधी आहेत.
कोणत्याही समस्या ज्या स्थानिक लोकांना आहेत त्या ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर  मांडणार नाही तर काय तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांसमोर  मांडणार आहेत ?
बैलगाडी शर्यत महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा विषय आहे..आणि त्यात  शेतकऱ्याचा कोणताही राजकीय हेतू नाही..
फार पूर्वापासून चालू असलेल्या शर्यतीच्या परंपरेला जेव्हा कोर्टाने  लगाम घातला तेव्हा हे स्थानिक वृत्तपत्र कुठे होते ? शेतकऱ्यांची बाजू त्यांनी मांडली का ? त्याच्या  वृत्तपत्रात छापली का ?
मग आता जेव्हा जल्लीकट्टू च्या आधारावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा ह्या गोष्टीचा विचार करत आहेत, त्या विचारांना, शेतकऱयांना मिळणाऱ्या पाठिंब्याला राजकीय खेळी बोलणं कितपत योग्य आहे ?
प्रत्येक राज्यातली स्थानिक वृत्तपत्र हि तेथील जनतेला पाठिंबा देण्यासाठी किंवा त्यांच्या समस्या  मांडण्यासाठी असतात..
ह्याचा विसर पडलाय असं वाटतंय..पर्यावरणाच्या ऱ्हास करून मोठ्या इमारती बांधणाऱ्या व्यावसायिकांच्या जाहिराती ह्यांच्या पहिल्या पानावर असतात.तेव्हा त्या पर्यावरणाचा पुनर्वसन करायचा लेख कोणी छापत नाही.
आणि ह्याच बाबतीत आम्हाला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तामिळनाडूच्या जनतेचा हेवा वाटतोय.
त्यांनी जल्लीकट्टू साठी केलेल्या आंदोलनांत तिथे प्रत्येक न्युज वाले आणि वृत्तपत्र त्यांच्या बाजूने  लढत होते..परंपरा टिकवण्यासाठी...
आज जर  मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत आहेत तर त्यात राजकीय खेळी कुठून आली ? जर तुम्ही शेतकऱ्यांच्या बैलगाडा शर्यती सोबत नसाल तर कमीत कमी असे लेख छापून वातावरण दूषित करू नका..
शेतकऱ्यांविषयी, त्याच्या जनावरांविषयी खरंच कुणाला खूप सहानभूती वाटत असेल तर त्यांनी शेतमालाला चांगला भाव मिळावा म्हणून, अडते आणि दलाल यांच्यामुळे शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबावी म्हणून धडपड करावी.
    तुमचा दिप्या 
 (कधी कधी कॉलेजला दांडी मारून बैलगाडा शर्यतीला जायचो )

Tuesday, 24 January 2017

कुरकुरे-कुरकुरे

मी इथे या ब्लॉग वर का लिहीतो??  यावर एकच उत्तर म्हणजे मला लिहावंसं वाटतं म्हणून लिहितो!. एखाद्या पेपर मधे ब्लॉग बद्दल छापून यावं म्हणून काही लिहीण्याचा उद्देश नसतो माझा.
प्रतिवाद, तर्क, समर्थन किंवा संतुलन  वापरून लिहीणे  म्हणजे  लेखन असा माझा (गैर) समज होता, हे त्या बाहद्दराच्या प्रश्नाने सिद्ध केलेले आहे. ’डोके’ वापरून ’धड’ न लिहीण्याचा प्रयत्न केल्यावर काय जातय याकडे काही लक्ष नाही,  तेंव्हा आपल्याला जी काही गरळ ओकायची आहे ती ओकून , आणि आपल्या  अल्प मती वर बौद्धिक सृजनशीलतेची पुटं चढवून किंवा नसलेली सर्जनशीलता अंगी बाणवून काही तरी अगम्य लिहिणे, आणि एखाद्याचा अपमान करणे हा आपला  अधिकार आहे असा समज काही पंडितांना (बहाद्दरांना) झालेला आहे असे दिसते. 
           अशी वाक्य लिहायला फार अक्कल लागते असे नाही, पण  नाळ तुटल्या सारखी वाटते मातृ भाषेबरोबरची, आणि  कृत्रिम पणा पण येतो लिखाणात. कपाळ भिंतीवर आपटून घ्यायची इच्छा झाली होती.(मी अस कधी करेल का )         विचारांची बैठक, खंबीर पणा, आणि विस्तृत वाचनामुळे  “लेखनाला ” एक  योग्य वळण लागते. पण जर वाचन विस्तृत असेल आणि ’वैचारिक बैठक’ जर पक्की नसेल तर मग ’डोंबल’ लिहायचं.
            अशाच काही  ’स्वयंघोषित साहित्यिक पंडितांनी” काही वर्षापूर्वी पुलं, वपुं, सुहास शिरवळकर, चिंतामणी लागू वगैरे अनेक लेखकांना  साहित्यिक म्हणून अनेक वर्ष मान्यता दिलेली नव्हती. मध्यमवर्गीय संस्कृती वर लिहीतात म्हणून वपु वर पण खूप टीका करण्यात  यायची.  अर्थात त्यांच्या मान्यता न देण्याने, किंवा टीका करण्याने  काही फारसा फरक पडला असे नाही, जनतेने तर ह्या सगळ्या लेखकांवर आणि त्यांच्या लिखाणावर मनापासून प्रेम केले. याचं  कारण  एकच- ते म्हणजे त्यांच्या लिखाणात नेहेमीच साधीसोपी  आणि मनाला भिडणारी भाषा.
बाबुराव अर्नाळकरांनी  हजाराच्या वर रहस्यकथांची पुस्तकं  लिहिल्यावर सुद्धा त्यांना लेखक, साहित्यिक म्हणून आजही मान्यता दिल्या गेलेली नाही. अहो निरनिराळ्या विषयांवर हजारो रहस्यकथा लिहीणे म्हणजे काय चेष्टा नाही.  ही उदाहरण देण्याचा अर्थ मी स्वतःला साहित्यिक वगैरे समजतो आहे असे नाही- तर ह्या टीकाकारांच्या टीकांकडे लोकं लक्ष देत नाहीत हे सांगणे आहे.
मी स्वतः विचार केला की मला वाचायला काय आवडेल? रंजनात्मक, ज्ञानात्मक की माहिती पूर्ण ? स्वतःच विचार केल्यावर “मला जे काही माहिती नाही ते मला वाचायला आवडेल” – मग ते कुठल्याही प्रकारचे लेखन असले तरीही चालेल. हा ब्लॉग  लिहित असतांना  मी हेच तत्व पाळून मला स्वतःला जे काही आवडेल तेच लिहत आलो आहे..
काही लोकांना प्रत्येकच गोष्टीला नावं ठेवायची सवय असते. मग तो एक प्रकारचा स्वभावच होतो . प्रत्येकच गोष्टी बाबत कुरकुर करण्याचा स्वभाव.  असं पहा (म्हणजे उदाहरण), सकाळी बायकोने मस्त चहाचा कप समोर आणला, आणि नेमकी साखर कमी झाली… यावर कुरकुरे महाशय नक्कीच ” काय हे? इतकी वर्ष झाली लग्नाला, तरीही चहा करता येत नाही का तूला” म्हणून कुरकुर करत चहाचा कप समोर धरेल. बायकोने टाकलेली एक चमचा साखर अगदी चहा थंड होई पर्यंत ढवळेल, आणि मग पुन्हा चहा गार झाला म्हणून कुरकुर करत बसेल..
याच परिस्थिती मधे दुसरा एखादा म्हणजे (नॉन कुरकुरे) मात्र बायकोला समोर बोलावून, एक घोट घे गं चहाचा, म्हणजे पुरेसा गोड होईल म्हणून बायकोला सांगेल.. चहाकडे पाहून बायको हसली,किंवा तिने एक घोट घेतला  की चहाची गोडी वाढेल असं म्हंटल्यावर बायकोला पण चहात साखर कमी झालेली आहे हे समजेल, आणि  तिचा पण मुड खराब होणार नाही. जीवनातला आनंद जर टिकवून ठेवायचा असेल तर कुरकुर करणे सोडणे, आणि जगात अस्तित्वात असलेल्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे एवढे केले तरीही पुरेसे आहे. (काही प्रसंग ऐकले,पहिले म्हणून नवरा बायकोचे उदाहरण दिले.)
माझा अनुभव असा आहे, जे  ’लुझर्स ’आहेत ते कुरकुरे असतात. असाच एखाद्या कुरकऱ्या जेंव्हा जेंव्हा संधी मिळते तेंव्हा त्याच्या ह्या कुरकुरीत स्वभावाचे यथार्थ दर्शन त्याच्या अगम्य आणि जडजंबाळ शब्द वापरून बोलण्यातून घडवतो.
कुठल्याही गोष्टीला चांगलं न म्हणता येणं  हा यांचा दोष असला तरीही त्याला आपला गुण समजतात. एखाद्या गोष्टी मधे वाईट काही सापडले नाही तर हे लोकं अस्वस्थ होत असावे.स्वतःबद्दल उगाच काहीतरी भ्रामक कल्पनांचा डॊंगर डोक्यात घेऊन हे समाजात वावरत असतात.” बहुतेक प्रत्येक चांगल्या गोष्टी मध्ये वाईट काय आहे, हे शोधायचं,आणि मग त्या बद्दल  कुरकुर करत रहायचं” असा स्वभाव असतो यांचा.  पेसिमिस्ट+सॅडीस्ट अशा प्रकारच्या  (अव)गुणांचे कॉंबीनेशन म्हणजे हे कुरकुरे.
एक कविता होती, गोविंदाग्रजांची , चिंतातूर जंतू नावाची. त्या कविते मधे गोविंदाग्रजानी अशा कुरकुऱ्या लोकांची मस्त उडवलेली आहे, ” सूर्याचे तेच उजाड उघड्या माळावर उगाच सांडते, ते बघवत नाही” असं म्हणणाऱ्या कुरकुऱ्याला ते म्हणतात, “मग डॊळे फोडून घेच गड्या”.
जेंव्हा तोच कुरकुऱ्या म्हणतो, झाडावर एवढी हिरवी पानं उगाच निर्माण केलीत, त्यांचं मातित पडल्यावर काय होत असेल? तर यावर गोविंदाग्रज म्हणतात, ”जा मातीत मिसळुनी पाही ”
”निंदकाचे घर असावे शेजारी”  म्हणतात,  म्हणूनच कुरकुऱ्याच्या निंदाजन्य उल्लेखावरून चांगलं काय ते घ्यायचं असा विचार केला तर एक गोष्ट लक्षात आ्ली, की  आपला ब्लॉग  कसाही असला तरीही दुर्लक्ष करण्यासारखा निश्चितच नाही, “लव्ह मी ऑर हेट मी, यु कान्ट इग्नोअर मी”! 
                       
     #तुमचा दिप्या

Saturday, 21 January 2017

लोककलेच्या लेकीची "स्वाक्षरी"

लोकसाहित्य आणि लोककला हे भारतीय लोकजीवनाचा जणू श्वास बनून राहिला आहे. त्यातूनच हजारो वर्षांची परंपरा लाभलेली आपली लोकसंस्कृती विकसीत होत गेली. येथील माणसाच्या भौतिक विकासा बरोबर लोकसाहित्य आणि लोककालांनीही हा विकास आणि बदल स्विकारीत आपला प्रवास आजही चालू ठेवला आहे. लोकजीवनात लोकसाहित्य , लोककला आणि आध्यात्म हातात हात घालून वावरू लागल्यामुळेच त्यांचा विकास शक्य झाला. लोककलातून आध्यात्माची शिकवण देणारे आणि माणसाला दु:खापासून दूर नेणारे विविध प्रकारचे तत्वज्ञान सोप्या भाषेत किंवा बोली भाषेत जपले गेले. या कलांमधील एक कला म्हणजे "तमाशा".
महाराष्ट्राच्या मातीत रुजली आणि फुललेली "तमाशा" ही कला जगाच्या विविध भागातील रसिकांना भुरळ पाडीत आली आहे. वेळोवेळी विविध संकटाशी सामना करीत आज ताठ मानेने समाजमनात स्थान निर्माण केलेल्या या लोककलेच्या विकासात अनेकांचे योगदान आहे. त्यातीलच एक आदराने घ्यावे असे नाव म्हणजे सौ. मंगलाताई बनसोडे.
महाविद्यालयाने मला एन.एस.एस विभागाच्या वतीने कोल्हापूर येथे चंद्रभागा चॅरिटेबल ट्रस्ट व शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय एकांकिका नाटक स्पर्धा , काव्य वाचन स्पर्धा अशा अनेक स्पर्धा आयोजन केलं होत.
तर मी व माझे सहकारी मित्र आणि मैत्रीण एकांकिका नाटकासाठी कोल्हापूरला रवाना झालो.
२०१२ चा चंद्रभागा चॅरिटेबल ट्रस्ट जीवनगौरव पुरस्कार सौ. मंगला बनसोडे यांना भेटला. त्यावेळेस त्यांनी आपला संघर्षमय जीवनप्रवास उलगडला.सौ.मंगलाताईची स्वाक्षरी घ्यायची असे ठरवले.
चित्रपटातील नायिकेबरोबर फोटो काढण्यासाठी लोक जीवाचं रान करतात. पण ज्यांनी आपली लोककला घुंगराच्या चाळा प्रमाणे गुंफून ठेवली. अशा लोक कलाकारांकडे आपण डोंकूनही पाहत नाही.
कार्यक्रम संपल्यानंतर मी स्वाक्षरी घेतलीच. खूप आनंद वाटला. महाविद्यालयात आल्यानंतर मी हे सांगितलं तर काही लोक हसले आणि म्हंटले स्वाक्षरी आणली कोणाची तर एका तमासगिरीन ची असो खूप दिवसातून माझी डायरी हाताळत बसलो होतो. त्यात मंगलाताईंची स्वाक्षरी मिळाली.आणि सारे प्रसंग आठवले.....

नेमक्या या मंगला बनसोडे कोण आहेत हे जाणून घेऊयात
गेली पाच दशक (५५ वर्षे) आपल्या जादुई अदकारीने अवघ्या महाराष्ट्राला रिझवत सौ. मंगला बनसोडे यांनी रसिकांच्या हृदय सिहांसनावर अढळ स्थान प्राप्त केले आहे.
कोणत्याही क्षेत्रात नाव कमवायचे म्हटले की त्यामध्ये संकटे आणि संघर्ष आलचं. अशा अनेक समस्यांना धीराने तोंड देत मंगलाताईनी आपल्या कलेचे कोरीव लेणे तयार करून ठेवले आहे. हे यशोशिखर सर झाल्यानं त्यामागची प्रेरणा सांगताना त्या अवर्जून उल्लेख करतात त्या आपल्या आईचा, राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचा व पती रामचंद्र बनसोडे यांचा. सौ मंगला बनसोडे यांना तसा तमाशाचा वारसा जूना आहे. नारायण खुडे तमाशा मंडळ आजोबा भाऊ बापू मांग नारायणगावकर तमाशा मंडळ , आई विठाबाई भाऊ नारायणगावकर या त्यांच्या तमाशातील पिढ्या फार गाजल्या. आई विठाबाईचा तर भारत सरकारकडूनच गौरव झाला आहे. यानंतर त्यांनी स्वत: हा वारसा चालवीत तमाशाची पताका राज्यभर मिरविली. आजही ही सेवा अखंड सुरूच आहे.
वयाच्या सातव्या वर्षी पायात घुंगरू आल आणि आजतागायत त्याचा छनछनाट सुरूच आहे. सुख दु:खाच्या हिंदोळ्यावर लहरत समाजमनाला आनंद देण्याचे काम मंगलाताईनी केले. आईची कलेची सेवा मंगलाताईंनी जवळून पहिली या कलेसाठी किती जीव तोडून काम करावे लागते याचा अनुभव सांगताना त्या म्हणतात , माझ्या आईने तमाशाच्या सेवेत सगळ आयुष्य वेचल माती व बैलगाडीच्या स्टेजपासून आतापर्यंतचा प्रवास तिने केला. मीही अनुभवला आहे. आणि अनुभवत आहे. आमच्या उदर निर्वाहाच साधन तमाशाच असल्याने खूप कष्ट सोसावे लागले. पोटात बाळ असतानाही नऊ महिने नऊ दिवस नाचतच राहायचं आणि बालांतीन म्हणून झोपून न राहता प्रसुतीनंतर अर्ध्या तासातच स्टेज गाठायचं ताप , थंडी , खोकला काहीही न पाहता पाठीवर बिऱ्हाड घेऊन पोटाची खळगी भरायला आणि लोकांचे मनोरंजन करायला गावोगाव फिरायचे.आमच्या आजोबांच्या तमाशा फडात १० ते २५ माणसांचा संच होता. हे सगळे घरातीलच कलाकार होते. आईच्या फडत ही संख्या वाढली. आम्ही चार बहिणी , तीन भाऊ , हे सगळे जावई. काका , मेहुणे , मामा , मावशी असा सुमारे ७० ते ७५ माणसांचा हा संच होता. जोरदार संचामुळे संपूर्ण महाराष्ट्रात "विठाबाई भाऊ मांग" या नावाने वादळ उठीवले होते. तिने घेतलेल्या कष्टातून आम्ही घडलो. राष्ट्रपती पदकाने तिच्या कष्टाचेही चीज झाले.
मंगलाताई बनसोडे या तमाशा फडनेही असेच वादळ उठविले आणि रसिकांची सेवा केली. १९८३-८४ ला मंगलाताईनी पती रामचंद्र बनसोडे यांच्या पाठबळावर स्वतंत्र फड उभा केला. नृत्य आणि नाट्याच्या उत्तम गुंफणीमुळे रसिकांना खिळवून ठेवण्याची ताकद या फडात निर्माण झाली. मंगलाताईचे नृत्य आणि पती रामचंद्र बनसोडे यांचे वगनाठ्य हे समीकरण पक्के झाले. उडत्या चालींच्या गाण्यासह बैठकीच्या आणि खड्या भावमधुर लावण्यांनी मंगलाताईनी महाराष्ट्रातील जत्रा , यात्रा , उरूस आणि बाजार घायाळ केले. तितक्याच ताकदीने त्यांची भक्त प्रल्हाद , येथे नांदते मराठेशाही , जिंकून आली शिवसेना , विष्णू बाळा पाटील , बापू बिरू वाटेगावकर , कारगिलच्या युध्य ज्वाला , राजीव गांधी हत्याकांड , जन्मठेप कुंकवाची , चंदन तस्कर डाकू वीरप्पन , हर्षद मेहता , गाव तंटामुक्त झाला पाहिजे आदी पौराणिक ऐतिहासिक व सामाजिक विषयावर भाष्य करणारी वगनाट्ये गाजली . धार्मिक आणि आध्यात्मिक वगही गावोगावी गाजविले.
मंगलताईनी तमाशा फड महाराष्ट्रात गाजवत असतानाच त्यांनी त्यासाठी आपल्या मुलाला नितीनलाही तयार करण्याचे काम केले या दोघा माय लेकांनी पुन्हा रसिकांच्या मनावर मोहिनी घातली. ती आजही कायम आहे. बदलत्या रुची नुसार श्रोत्यांना काय हवे ते देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. मंगलताई म्हणतात " माझे शिक्षण चौथी इयत्तेपर्यंत झाले आहे. मात्र इतरांनी अधिक शिकावे असे वाटते. समाजाची सेवा करण्यासाठी स्वतः शिक्षण घेणे गरजेचे आहे. सामाजिक भान असल्यामुळे आणि त्याचा विकास व्हावा अशीभावना जपल्यामुळे राज्यातील पाच प्राथमिक व तीन माथ्यामिक तसेच कराड , सातारा , इगतपुरी पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी , काही ठिकाणी मंदिरे उभारण्यासाठी माझ्या कार्यक्रमातून मी मदत करू शकले. याचे मला मोठे समाधान आहे ."
मंगलाताईचे सारेच काम नवचैतन्य आणि उर्मी देणारे आहे. त्याची कदर महाराष्ट्र राज्य शासनालाही करावी लागली. त्याचे फळीत म्हणजे ताईना २००१ साठी प्रथमत:च सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अण्णाभाऊ साठे पुरस्काराने गौरविण्यात आले. याशिवाय शासनाने तमाशा कलावंतासाठी सुरु केलेला विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. आईच्या मृत्यू आणि कार्यक्रम करून परतत असताना बसने पेट घेऊन झालेला अपघात हे मंगलाताईच्या आयुष्यातील सर्वात मोठे दु:खाचे क्षण. आयुष्यात इतर अनेक दु:खे पचाविणाऱ्या ताईचे मन आईच्या जाण्याच्या घटनेने आजही व्याकुळ होते. वयाच्या सातव्या वर्षापासून आज एकसष्ठ वर्षापर्यंत अखंड रसिक सेवा करीत आलेल्या या महान कलावंतीनीला आई विठाबाई प्रमाणे " राष्ट्रपती पुरस्काराने गौरविले जावे ही तमाम तमाशा रसिकांची आणि लोककलेच्या अनेक उपासकांची इच्छा आहे. त्यासाठी आपण सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा."
  मी एका तमासगिरीन ची स्वाक्षरी घेतली नाही तर लोककलेचा वारसा चालवणाऱ्या लेकीची स्वाक्षरी घेतली. याचा मनोमन आनंद वाटतोय.
(कदाचित माझ्या डायरीच्या स्वाक्षरी केलेल्या कागदाचा भाव वाढणार हे नक्कीच)
  
                                                                                        मंगला बनसोडे यांचा संपर्क
                                                                                 मुख्य कार्यालय - मु. पो. नारायणगाव 
                                                                                                           (तमाशाची पंढरी)
                                                                                         तालुका - जुन्नर , जिल्हा - पुणे . 
                                                                                          फोन न. (०२१६४) - २७११८९ ,
                                                                                                       +९१९८२२९०१९४८
                                                                                                       +९१ ९६६५३३९३३३ 

Thursday, 19 January 2017

राजकारणी... नरेंद्र आणि विश्लेषक.. योगेंद्र

राजकीय-सामाजिक विश्लेषक , ‘स्वराज अभियान’चे प्रवर्तक "योगेंद्र यादव" यांच्या बरोबर फोनवर बोलण्याची संधी भेटली.
योगेंद्र यादव यांना पहिल्यांदा गोवा येथे भेटलो. त्यांचे कार्य काय आहे हे ऐकल्या नंतर त्यांना काही प्रश्न विचारले. त्यातून त्यांनी थोडक्यात मला ई मेल वर उत्तर दिले.
भाजपविरोधी महाआघाडीने धर्माधिष्ठित राजकारण थांबणार नाही, त्यामुळे काही पापे जरूर झाकली जातील एवढेच. मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करणे सोपे काम आहे, पण आर्थिक धोरणातील मूलभूत मुद्दय़ांवर भाजप व काँग्रेसच्या जवळपास सारख्या मतांपासून ही महाआघाडी मुक्त कशी असेल? आजघडीला पक्षीय राजकारणात सार्थ आणि समर्थ पर्याय नाही.. तो पर्याय विखुरलेल्या आंदोलनांतून तयार होईल का?
हे वर्ष संकुचित मानसिकतेच्या महाआघाडीचे वर्ष असेल काय, असा प्रश्न मनात आला. मोठय़ा स्वप्नांची पूर्तता करण्याच्या नावाखाली नवीन आघाडय़ा देशात तयार होतील अशी शक्यता वाटते, पण निवडणुकांच्या निमित्ताने होणाऱ्या या आघाडय़ा देशाला संकुचित करतील, अशी भीतीही त्यात आहे. जसजसा देशाच्या राजकीय आकाशात मोदींचा सूर्य अस्तांचलाकडे चालला आहे त्या पाश्वभूमीवर देशातील राजकारणात संकुचित मानसिकतेच्या महाआघाडय़ांचा हा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करीत जाणार आहे.
२०१४ हे वर्ष देशाच्या राजकारणात नरेंद्र मोदी यांच्या प्रभावाचे वर्ष म्हणून ओळखले गेले, तर २०१६ हे वर्ष आता मोदींची जादू उतरत गेल्याने सर्वाच्या स्मरणात राहील. केवळ दिल्ली व बिहारच्या निवडणुकांत भाजपचा पराभव झाल्याने मी असे म्हणत नाही. निवडणुकांतील पराभवाशिवायही मोदी आजही लोकप्रिय नाहीत असे कुणी म्हणणार नाही. मनमोहन सिंग यांच्या तुलनेत मोदी हे खूपच चांगले पंतप्रधान आहेत असे जनतेला आजही वाटते. हे खरे असले तरी त्यांची ती जादू आता राहिली नाही. मोदींनी हरियाणा व महाराष्ट्रात केवळ स्वत:च्या नावावर निवडणुका जिंकल्या होत्या तशी परिस्थिती आता राहिलेली नाही. आता लोक पंतप्रधान मोदी यांच्या परदेश दौऱ्यांबाबत विनोद करू लागले आहेत व त्यावर हास्यकल्लोळही होत आहेत. आता अमित शहा व मोदी त्यांच्याच जुन्या वक्तव्यांच्या जाळ्यात अडकत चालले आहेत. गावे-खेडय़ात सरकारच्या कामगिरीवर शेतकरी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. गाव असो वा शहर, सगळे लोक मोदींच्या ‘अच्छे दिन’च्या घोषणेवर आता शंका घेऊ लागले आहेत.
पर्यायाचा शोध सुरू झाला आहे पण तो सध्या तरी दिसलेला नाही. पर्यायाच्या नावाखाली पुन्हा जुनेच, थकलेभागलेले राजकारणी दंड ठोकून उभे आहेत, त्यांना कंटाळूनच खरे तर लोकांनी मोदींना संधी दिली होती. एकटय़ाने भाजपशी सामना करू शकत नाही म्हणून ते एकमेकांची मदत व पाठिंबा घेऊन पुढे येत आहेत. बिहारमध्ये महाआघाडीचा जो विजय झाला त्यात या अगतिकतेतून एकत्र येण्याच्या प्रयोगाचे मनोबलही वाढले आहे. भाजपविरोधी आघाडीसाठी वैचारिक व सैद्धांतिक आधार शोधले जात आहेत. २०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांवर त्याचा फार मोठा परिणाम झाला नाही, कारण पश्चिम बंगाल, तामिळनाडू व केरळ या राज्यांत भाजपची तेवढी ताकद नाही व आसाममध्ये भाजपविरोधाच्या राजकारणाला काही अर्थ नव्हताच. या राज्यांमध्ये अशा आघाडय़ा अनेकदा तयार झाल्या आहेत. महाआघाडीची कसरत या २०१७ मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश निवडणुका व नंतरच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी होत आहे. महाआघाडीत कोण कोण सहभागी होईल हे आताच स्पष्ट झालेले नाही, पण एवढे खरे, की काँग्रेस त्याचे नेतृत्व करील व जनता परिवाराचे तुकडे त्यात सामील होतील. जेव्हा जेव्हा डाव्यांना संधी मिळेल किंवा त्यांना गरज असेल तेव्हा ते अशा आघाडय़ांमध्ये सामील होतील. हेही स्पष्ट आहे की, आम आदमी पक्षाला या आघाडीत सामील होण्यावाचून गत्यंतर नाही. पुढच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत या महाआघाडीची रचना कशी सामोरी येते यावर ती कितपत गंभीर आहे, त्यांना किती संधी आहे व कशा प्रकारच्या राजकीय वाटाघाटी होतील हे अवलंबून आहे.
या महाआघाडीत राजकारणातील जुन्या-नव्या शक्तींना संधी मिळणार आहे, राजकीय विश्लेषकांना चर्चेसाठी बराच मालमसाला मिळणार आहे, पण देशासाठी त्यात काय असणार आहे? देशासाठी कोणत्या संधींचे, प्रगतीचे दरवाजे या महाआघाडीने खुले होणार आहेत, हा प्रश्नच आहे.
या महाआघाडीचे समर्थक, शिल्पकार असा दावा करतील की, जातीयवाद, धर्मवाद यांना दूर ठेवून धर्मनिरपेक्षतेचा बचाव करण्याची ही संधी आहे. काँग्रेसला हा युक्तिवाद निश्चितच आवडेल. काँग्रेस थकले-भागलेले व बुडते राजकारण करीत आहे, त्यांना यात नैतिक आधार वाटल्याशिवाय राहणार नाही. पण त्यातून देशाला काही फायदा होईल हे तर्कट खरे नाही. ही महाआघाडी कदाचित काँग्रेसला वाचवेल पण धर्मनिरपेक्षतेला वाचवू शकणार नाही. एक तर देशभरात भाजपविरोधात राजकारण केल्याने प्रदीर्घ काळाचा विचार करता भाजप कमजोर नव्हे तर बलवान होईल. दुसरे म्हणजे भाजपचे राजकारण धर्मनिष्ठ आहे याचा अर्थ असा नाही की, भाजपच्या विरोधातील पक्ष धर्मनिरपेक्ष आहेत. काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल यांसारखे पक्ष मुस्लिमांच्या मतपेढीचे राजकारण करीत आहेत, त्यामुळे त्यांना धर्मनिरपेक्ष म्हणणे योग्य नाही. धर्माधिष्ठित राजकारणाच्या विरोधातील सामना केवळ भाजपला निवडणुकीत पराभव करून जिंकता येणार नाही, त्यासाठी जनमानसातून धार्मिकतेचे विष काढावे लागेल व त्यासाठी लोकांना त्यांच्याच भाषेत ते समजावून सांगावे लागेल, त्यांच्याशी संवाद साधावा लागेल. धर्मनिरपेक्षतेच्या ठेकेदारांनी गेल्या पन्नास वर्षांत ते विष काढून टाकण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे हिंदू व मुसलमान यांच्या मनात विष पेरणाऱ्यांचे फावले आहे.
भाजपविरोधी महाआघाडीमुळे धर्माधिष्ठित राजकारण थांबणार नाही, त्यामुळे काही पापे जरूर झाकली जातील एवढेच.  वेळ येईल तेव्हा मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करणे सोपे काम आहे, पण आर्थिक धोरणातील मूलभूत मुद्दय़ांवर भाजप व काँग्रेसच्या जवळपास सारख्या मतांपासून ही महाआघाडी मुक्त कशी असेल? देशाच्या अर्थकारणावर मोठय़ा कंपन्यांची पकड असेल आणि राष्ट्रीय संपत्तीची लुटालूट चालू असताना मुलायमसिंह व शरद पवार प्रश्न कसे उपस्थित करतील? शेतकरी व कामगारांची दुर्दशा हा राष्ट्रीय मुद्दा कसा बनू शकेल? असे अनेक प्रश्न आहेत.
या महाआघाडीच्या राजकारणाने पर्याय व शक्यतांचा विस्तार होण्याऐवजी त्या संकुचित होतील, पर्यायहीनतेने अगतिकता वाढेल व संकुचित मानसिकतेचे राजकारण होईल.
      धर्माधिष्ठित राजकारणाचा विरोध करण्याच्या नावाखाली देशातील महत्त्वाचे राजकीय व आर्थिक प्रश्न बाजूला ठेवून राजकारण केले जाईल. त्यामुळे भाजप कमकुवत होईल असे वाटत नाही. सामान्य जनतेने पर्याय म्हणून मोदींना सत्ता दिली होती. समर्थ पर्यायाची भूक अजून कायम आहे ती भागवल्याशिवाय कुठलीही महाआघाडी मोदींचा सामना करणे शक्य नाही.
नव्या वर्षांतील राजकारण पुन्हा अनिश्चिततेचे असेल की, कुठला नवीन पर्याय आपल्यासमोर येईल. प्रस्थापित पक्षांमधून हा पर्याय पुढे येईल असे वाटत नाही. पहिल्यांदा आम आदमी पक्षाने लोकांना आशा लावली होती, पण आता तो पक्षही भारतीय जनता पक्षासारखाच बनला आहे. एका व्यक्तीच्या हातात असलेला तो दिल्लीतील एक पक्ष आहे व अकाली-काँग्रेस नेत्यांच्या मदतीने पंजाबात सत्तेवर येण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. त्यामुळे लोकांच्या आशाआकांक्षा पूर्ण करीत धर्म-जातिधिष्ठित राजकारणाला तिलांजली देणारा नवा पर्याय उभा करणे ही आजच्या काळात ऐतिहासिक जबाबदारी आहे. नव्या वर्षांत पर्यायी राजकारणाची आशा करता येऊ शकते, पण तो पर्याय नेहमीच्या राजकीय चौकटीपलीकडचा असू शकतो. आज देशाच्या कानाकोपऱ्यात आंदोलने होत आहेत. शेतमालाचे कोसळते भाव, त्यांचा वाढता उत्पादन खर्च, त्यात भर म्हणून दुष्काळाचे संकट व बनावट कीटकनाशकांमुळे आलेल्या समस्या, यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. बऱ्याच काळानंतर विद्यार्थी व युवकांचा आवाज देशपातळीवर हळूहळू उमटू लागला आहे. भ्रष्टाचारविरोधी संकल्प करणारे जनलोकपालाचे समर्थक एकत्र येत आहेत. दारू व नशेच्या विरोधात महिलांची आंदोलने होत आहेत. देशाला हिंदू-मुस्लिमांत विभागण्याच्या प्रयत्नांविरोधात सामान्य नागरिक उभा ठाकला आहे. ही सगळी आंदोलने एका छत्राखाली नाहीत. हे सगळे प्रश्न मोठे आहेत, पण ज्या संघटना त्यावर आवाज उठवीत आहेत त्या लहान आहेत. नव्या वर्षांत ही लहान स्वरूपातील आंदोलने करणाऱ्या संघटना एकत्रित येऊन पर्यायी राजकारणासाठी ऊर्जेचा मोठा संगम होईल का, या प्रश्नाच्या उत्तरात भारतातील आगामी राजकारणाची दिशा निश्चितपणे सापडेल असे मला वाटते.
                                                                              (त्यांचा ई-मेल yogendra.yadav@gmail.com)
                                                                                 माझा ई -मेल deepak.kathale@gmail.com

Saturday, 14 January 2017

उत्तरप्रदेशात 'हानिकारक बापू '..? (भाग २)

आपण पहिल्या भागात साधना गुप्ता हि महिला मुलायम यांच्या संपर्कात आली. इथपर्यंत आलो होतो
आज ज्या प्रतीक यादवला मुलायमसिंह यांचा दुसरा मुलगा समजले जाते,तो प्रतीक तेव्हा एक वर्षाचा होता.साधना गुप्ता आणि त्यांचे पती चंद्रप्रकाश गुप्ता यांचा हा मुलगा. पुढे मुलायमसिंहांच्या 'प्रेमात पडल्याने' १९९० मध्ये साधना यांनी घटस्फोट घेतला आणि मुलायमसिंहांबरोबर त्या लिव्ह-इनमध्ये राहू लागल्या.मलतीदेवी ह्या दम्याने पीडित होत्या.त्यामुळे त्या काळात मुलायमसिंहांचे दोन संसार चालू होते.आजारी असलेल्या मालतीदेवी पुढे २००३ मध्ये मरण पावल्या आणि त्यानंतर मुलायमसिंहांनी साधना गुप्ताला पत्नी आणि प्रतीक ला मुलगा म्हणून अधिकृतरित्या स्वीकार केले.
मुलायमसिंहांची हि व्यक्तिगत मसाला स्टोरी ह्या संपुर्ण प्रकरणात महत्वाच्या भूमिकेत आहे,कारण या यादव परिवारात 'यादवी' होण्यामागे साधनाबाई ची भूमिका मध्यवर्ती समजली जाते.प्रतिकला मुळात राजकारणाची आवड नव्हतीच. तो बॉडीबिल्डर आहे आणि लखनौ मध्ये सध्या जिम आणि रियल इस्टेटचा व्यवसाय करतो.
मात्र त्याच्या आईला वाटते कि प्रतिकची उपेक्षा होतेय.हे साधना गुप्ता (यादव) प्रकरण ज्या शिवपाल यादव ह्यांना सर्वप्रथम समजले होते, ते शिवपालकाका सुद्धा प्रतिकला पुढे आणण्याच्या प्रयत्नात असतात.आणि त्यात भर म्हणून , प्रतिकची बायको - पूर्वाश्रमीची अपर्णा बिष्ट हीदेखील अत्यंत महत्वाकांक्षी आणि राजकारणाची आवड असलेली आहे. हि अपर्णा यादव , मुलायमसिंहांच्या उमेदवारांच्या सुचीमध्ये लखनौ -केंट विधानसभा क्षेत्राची समाजवादी पक्षाची उमेदवार आहे.
आजारी आई आणि वडिलांचे पूर्णवेळ राजकारण , ह्यामुळे अखिलेश यादव यांचे अधिकांश शिक्षण बाहेरच झाले.धौलपुरच्या राजस्थान सैनिकी शाळेत त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले.पुढे मैसूरच्या एम.जे.अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी सिव्हिल इंजिनियरिंग केले आणि नंतर ऑस्ट्रेलियाच्या सिडनी विद्यापीठातून त्यांनी पर्यावरण अभियांत्रिकीमध्ये एम.एस. केले.अर्थातच , काहीशा सुधारलेल्या ,पुढारलेल्या , शिक्षित अशा लोकांकडे अखिलेश यादव यांचा कल असणे स्वाभाविकच आहे आणि म्हणूनच व्यवसायाने प्राध्यापक असलेल्या रामगोपाल यादव ह्या काकांकडे त्यांचा ओढा आहे.
ह्यांच्या उलट ,सध्या मुलायमसिंहांच्या सर्वात जवळ असलेले त्यांचे धाकटे बंधू शिवपाल यादव यांचे शिक्षण जरी बी.पी.एड. पर्यंत झाले असले , तरी त्यांचा गोतावळा अल्पशिक्षित आणि गुंडप्रवृत्तीच्या लोकांचा आहे. समाजवादी पक्षात मुख्तार अन्सारी ह्या कुख्यात डॉनचा पक्ष विलीन करवण्यात शिवपाल यांचीच मोठी भूमिका होती, तर अखिलेश यादव यांनी ह्या विलिनीकरणाचा विरोध केला होता.
एकुणात नुकत्याच घडत असलेल्या यादवीची हि पार्श्वभूमी आहे. या कहाणीत शिवपाल यादव ,अमर सिंह,साधना गुप्ता-यादव हि सर्व मंडळी (जर अखिलेश यादवला नायक समजले ,तर)खलनायकाच्या भूमिकेत आहेत.
जे घडायचं ते घडून गेलं आहे. अखिलेश आणि मुलायम हे दोघेही आपापल्या मार्गावरून फार पुढे गेलेले आहेत.त्यांनी तिथून परतण्याची किंवा समाजवादी पक्ष परत नेताजींच्या (मुलायमसिंहांच्या)नेतृत्वाखाली एक होण्याची शक्यता अगदी धूसर आहे.       निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे.११ फेब्रुवारी पासून २८ फेब्रुवारी पर्यंत प्रत्येक चौथ्या दिवशी U.P त मतदान होणार आहे.११ मार्चला निकालाची घोषणा आहे.
अशा पार्श्वभुमीवर या 'यादवी' चा उत्तर प्रदेशातल्या राजकारणावर काय परिणाम होईल ,हे बघणे महत्वाचे ठरते.
'यादवी' सुरु होतानाचे चित्र हे समाजवादी पक्षाच्या किंवा अखिलेश यादवच्या बाजूने नव्हते.प्राथमिक आणि प्रारंभिक सर्वेक्षणात भाजपा आणि बसपा हे पक्ष समाजवादी पक्षाच्या बरेच पुढे होते.मात्र उत्तरप्रदेशात हि 'दंगल' सुरु झाल्यांनंतर चित्र बदलायला सुरवात झाली.कारण समाजवादी पक्षात भांडणे होणे आणि तो पक्ष कमकुवत होणे म्हणजे मुस्लिम मते बसपाच्या पारड्यात जाणे.उत्तरप्रदेशात अनेक विधानसभा क्षेत्रात मुस्लिम मत निर्णायक ठरतात. आणि मुस्लिम समाज हा ताकदवान पक्षालाच मते देतो.त्यामुळे त्यांची एकगठ्ठा मते बसपाला मिळाली ,तर भाजपाला त्याचा फटका बसू शकतो,हे गणित समोर दिसत होते .
मात्र समाजवादी पक्षात झालेल्या ह्या 'दंगली' नंतर अखिलेश यादव हे अधिक शक्तीशाली बनून समोर आहे आहेत. साफसुथरी,गुंडप्रवृत्तीना विरोध करणारी आणि विकासाला कटिबद्ध अशी त्यांची प्रतिमा मतदारांच्या नकळत निर्माण झाली आहे. त्यांनी रेकॉर्ड वेळेत निर्माण केलेल्या आग्रा हायवेसारख्या प्रकल्पामुळे ती छबी अधिकच उजळ झाली आहे.गेल्या पाच वर्षात समाजवादी पक्षाच्या सरकारचा अँटीइन्कम्बन्सी फॅक्टर मुलायमसिंह-शिवपाल यादव-अमर सिंह यांच्या रुपाने समोर आला आहे आणि त्यामुळे अखिलेश सरकारवरचा अँटीइन्कम्बन्सीचा प्रभाव आणि नाकर्तेपणाचे आरोप बाजूला सारले गेले आहेत.
हे जरी असले ,तरीहि एकट्या अखिलेश यांच्या बळावर सत्ता मिळवणे हे ह्या विभाजित समाजवादी पक्षाला शक्य नाही आणि म्हणूनच बिहार निवडणुकांच्या धर्तीवर 'महायुती' (महागठबंधन)तयार करण्याचे अखिलेश यांचे सर्व प्रयत्न आहेत.त्या दृष्टीने काँग्रेस बरोबर त्यांची बोलणी चालू आहेत.इकडे काँग्रेस तर गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे.त्यांचे रणनीतिकार असलेल्या प्रशांत किशोरच्या लक्षात आलेले आहे कि काँग्रेस पक्ष एकाकी लढला ,तर त्याचे पानिपत निश्चीत आहे.या युतीमध्ये अजितसिंहाचे लोकदल आणि इतर लहान पक्ष येऊ शकतात.आणि तसे जर झाले ,तर उत्तरप्रदेशात त्रिकोनी संघर्ष होऊ शकतो.
४ जानेवारीला निवडणुकीची घोषणा झाल्याबरोबर U.P च्या राजकारणाला प्रचंड वेग आलेला आहे . या सर्व परस्थितीत अखिलेश-काँग्रेस युतीचा फायदा भाजपाला होईल कि नाही, हे आज तरी स्पष्ट नाही .पण हि ' दंगल ' झाली नसती ,तर समाजवादी पक्ष आणि काँग्रेस एकत्र येणे कठीण होते आणि तसे जर झाले असते, तर अखिलेश यादवचे काही खरे नव्हते , हे निश्चित !!
                          

Friday, 13 January 2017

उत्तरप्रदेशात 'हानिकारक बापू'.....? (भाग १)

ज्या वेळेस दंगल ह्या चित्रपटातील गाणे, 'बापू, सेहत के लिये तू तो हानिकारक हैं.....' हे सोशल मीडियावर ट्रेंड होत होते , नेमके त्याच वेळेस उत्तर प्रदेशातील 'यादवी दंगल' आणि मुलायम - अखिलेशमधील ट्रेडिंगमध्ये सर्वात वरच्या जागी होते.
ह्या दोन्ही गोष्टींचा परस्पर संबंध जोडून , संपूर्ण U.P त सोशल मीडियावर कार्टून्स , पोस्ट, कॉमेंट्स यांचा महापूर आला होता. मात्र या सर्वांतून एक संदेश अगदी स्पष्टपणे लोकांपर्यंत जात होता - 'हानिकारक बापू' चा ...! उत्तर प्रदेशातल्या ह्या यादवीत बापू म्हणजे नेताजी मुलायमसिंह हे खलनायकाच्या भूमिकेत उभे होते आणि लोकांची सहानुभूती अखिलेश यादवकडे वळलेली दिसत होती !
U.P तल्या राजकारणाच्या दृष्टीने हि फार मोठी घटना होती. फक्त तीन दिवसात समाजवादी पक्षाचे केंद्र मुलायमकडून सरकून अखिलेशकडे आलेले दिसत होते .आजपर्यंत समाजवादी पक्ष ज्यांनी स्थापन केला , चालवला , दोनदा ह्या पक्षाला U.P त सत्ता मिळवून दिली , ते मुलायमसिंह या सर्व प्रकरणात असाहाय्य आणि दयनीय दिसत होते.अपवाद सोडल्यास पूर्ण पक्षच अखिलेशच्या नेतृत्वात उभा राहिलेला दिसत होता.
U.P तल्या ४०३  विधानसभा जागांपैकी २०१२ च्या निवडणुकांत समाजवादी पक्षाला २२४ जागांसकट पूर्ण बहुमत मिळाले होते. यापैकी २०४ आमदार या क्षणी अखिलेशच्या बाजूला आहेत.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत, भाजपच्या झंझावातासमोर टिकून राहून समाजवादी पक्षाचे जे पाच खासदार निवडून आले, त्यापैकी चार अखिलेशच्या बाजूला आहेत.गंमत म्हणजे हे पाचही खासदार 'यादव' परिवारातलेच आहेत.
थोडक्यात काय तर समाजवादी पक्षातली मुखिया ची जागा या क्षणी तुलनेने अत्यंत तरुण असलेल्या अखिलेशकडे आलेली आहे.आणि हेच उत्तर प्रदेशाच्या राजकारणातले एक मोठे आश्चर्य आहे.
याला मुलायमराव आणि अखिलेशदादा यांच्या कार्यशैलीतला फरकही आहे.
समाजवादी पक्ष म्हणजे खऱ्या अर्थाने मुलायमसिंह यादव यांचा परिवार. मुलायमसिंह हे पाच भावंडांतले दुसऱ्या नंबरचे . मुलायम यांनी पैलवानकी करावी अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र मैनापुरीमध्ये झालेल्या त्यांच्या पहिल्याच कुस्तीत आमदार नत्थुसिंह प्रभावित झाले. नंतर नत्थुसिंहांच्या छत्रछायेखाली मुलायमसिंहांची राजकीय वाटचाल सुरु झाली.
१९८९ ते १९९१ या काळात ते उ.प्रदेशात जनता पक्षाच्या सरकारचे मुख्यमंत्री होते. पुढे १९९२ च्या ऐतिहासिक करसेवेच्या फक्त तीन महिने आधीच त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली आणि पुढे दोनदा मुख्यमंत्री झाले.
मुलायमसिंहांनी सर्व परिवाराला वेगवेगळी पदे देत सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची भूमिका घेतली होती.
अखिलेश यादव हा त्यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेला एकुलता एक मुलगा . अखिलेश झाल्यानंतर लगेचच त्यांची पत्नी मालतीदेवी आजारी राहू लागल्या.त्यामुळे काका रामगोपालसिहांनी अखिलेशचा जास्त सांभाळ केला.म्हणूनच काका- पुतण्याची जोडी U.P च्या राजकारणात ठामपणे उभी आहे.
साधारण १९८९ च्या सुमारास साधना गुप्ता हि महिला
मुलायमसिंह यादव यांच्या संपर्कात आली.
         पुढे काय होते ते दुसऱ्या भागात .....

Wednesday, 11 January 2017

माझीया मनीचा भाव

आपल्या असण्याला शब्दात रेखाटणे तसे अवघड काम. 
साहित्यिक चौकटींमध्ये रचणे,त्याहून अवघड उदयोग. 
जुन्नर , निसर्गाने अभूतपूर्व सौंदर्याची उधळण केलेला, पाच धरणे,शिवनेरी सह सात गड, किल्ले, सातवाहन काळातील अजरामर खूणा , बौद्ध लेण्या ,जगविख्यात महादुर्बिन ,देशातील पहिले दळणवळण केंद्र, राष्ट्रपती पदक विजेती लावणीसाम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर हिच्या कलेने आणि वरील बाबींच्या संगतीने जगण्यात जुंद्री ठसका मुरवलेल्या अतरंगी माणसांचा हा सह्याद्रीच्या कुशीतला प्रदेश.

या भोवतालच्या खाणा-खुणा, माणसे आणि घटना यांचा मोठा संचय केलेल्या माझ्यासाठी पुणे एक नवी दुनिया होती. 
पुणे. साहित्य, इतिहास, कला, बहुसांस्कृतिक- राजकीय उलाढालींचे केंद्र असलेले शहर. इथे आयुष्याची नवी इनिंग खेळायला आलेलो मी अनेक घटना, बाबी आणि सामाजिक वास्तवाची मांदियाळी अनुभवायला मिळत आहे . माझ्यातील लेखक टीपकागदासारखा हे जगत आहे .
अभ्यासक्रम सुरु असताना जगभरात अनेक उलाढाली घडत आहेत.
           लेखणीला धार येत आहे . सोशल मिडिया, ऑनलाईन पत्रकारितेचा खूप मोठा विस्तार वाढत आहे. 
तेंव्हा ‘पहिली घंटा ’हा मराठी साहित्य, राजकारण आणि सांस्कृतिक उलाढालींवर ‘क्ष-किरण’ टाकणारा ब्लॉग मी मैत्र- मैत्रीण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केला.
आज या ब्लॉगवरील लेखाचे जगभरातील मराठी वाचक आहेत. याचा खूप अभिमान आणि आनंद वाटत आहे.
जे जे मला माझ्या लेखणीला शाबासकी देत आहे त्यांचे मनापासून आभार 
  “जगाच्या तुलनेत देश लहान. देशाच्या तुलनेत एकटामाणूस लहान. समूहांच्या तुलनेत एकटा माणूस लहान. या लहान एकटेपणातून आलेल्या फालतूपणाचं काय करायचं? मुंगी आकाराने छोटी असते पण ती तुमच्या ढुंगणाला चावू शकते. ...तुम्ही तिच्या ढुंगणाला चावू शकता का? नाही ना? म्हणून कुणालाही कमी लेखू नये.” 
माझ्या लेखणीला आणखी  नवनवे धुमारे फुटोत,या शुभेच्छारुपी आशीर्वाद देणाऱ्या सर्व हीतचिंतक यांच्या शुभेच्छांचे चीज केल्याशिवाय फुलस्टाँप घेणार नाही.

संविधान सभेतील मोहंमद अली जिना यांचे भाषण

"कायदे आझम" नावाच पुस्तक आहे हे मला माहितीच नव्हतं असेच एक दिवस माझी मैत्रीण तेजाली हिच्या कडे ते पहिले आणि ती आमच्या विभागाच्या ग्रंथालयात परत करण्यासाठी जात होती. तेव्हा मी तिच्याकडून हे आनंद हर्डीकर लिखित ४३१ पानांचं पुस्तक घेतले आणि वाचनाला लागलो. त्यातून लेखणी काय स्वस्थ बसू देत नव्हती म्हणून हा लेख आपल्यापुढे मांडत आहे. 
      हिंदू समाजव्यवस्था व मुस्लीम समाजव्यवस्था फार वेगळ्यावेगळ्या आहेत असे समजण्याचे कारण नाही.
                       न्याय, सकारात्मकता ही आपली तत्त्वं
                          कायदे आजम मोहम्मद अली जीना.
आपण मला दिलेल्या आदर  सत्काराबाबत मी आपला मनापासून आभारी आहे. घटना समितीने माझी प्रथम राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड केली  गौरव केला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. माझ्याबद्दल ज्यांनी ज्यांनी कौतुकाचे बोल काढले आहेत, त्यांचादेखील मी आभारी आहे. मला प्रखर आशावाद आहे की, आपल्या सर्वांच्या अनुमतीने, आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही घटना समिती संपूर्ण जगासाठी एक उत्तम उाहरण ठरेल. घटना समितीला महत्त्वाची दोन  कामे प्रामुख्याने करायची आहेत. प्रथम अग्रणी  असलेले काम म्हणजे पाकिस्तान देशासाठी संविधाननिर्मिती आणि दुसरे काम म्हणजे पाकिस्तान संघराज्याचे प्रशासन व्यवस्थितपणे चालवण्याचे काम. पाकिस्तान संघराज्याचे संविधान बनविताना आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. तुम्हांला ही गोष्ट माहीत पाहिजे की, एकाच द्वीपखंडातील दोन देश  एकमेकांपासून विभक्त होत आहेत. आपणच नाही तर संपूर्ण जग या घटनेकडे कुतूहलाने, आश्चर्याने बघत आहे. ही एकमेवाद्वितीय घटना आहे. जगात कुठेही आजवर घडली नसेल अशी ही घटना आहे. मुख्य म्हणजे क्रांतीच्या उंबरठ्यावर आपण शांततेने हे मिळविले आहे. संविधाननिर्मितीच्या बाबतीत काय काय केले  पाहिजे याबद्दल या ठिकाणी मी काही भाष्य करणार नाही, परंतु हे सांगू इच्छितो की, तुम्ही सर्व एका सार्वभौम देशाच्या वैधानिक व्यवस्थेचा भाग आहात, तुम्हांला या वैधानिक व्यवस्थेने काही अधिकार दिलेले  आहेत. त्यामुळे तुम्ही काय निर्णय घ्याल व कसे घ्याल हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना याबाबतीत जबाबदारीने वागावे लागणार आहे, हे कायम लक्षात ठेवले पाहिजे. एका मुद्द्यावर आपण सगळे सहमत असलो पाहिजे की,देशात कायदा  व सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी  आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे नागरिकांचे जीवन, मालमत्ता, धार्मिक स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टींची काळजी घेणे आपले आदिम कर्तव्य असायला हवे.
दुसरी एक गोष्ट आपणांस सांगू इच्छितो की, सध्या अखंड भारत देश  एका भयंकर शापाने प्रभावित आहे. तो शाप म्हणजे लाचखोरी आणि भ्रष्टाचार होय. इतर देशांना  हा शाप नाही असे नाही. परंतु आपली स्थिती इतर देशांपासून फारच बिकट आहे. लाचखोरी व भ्रष्टाचार हे विष आहे. त्यांच्याशी आपल्याला दोन  हात करावे लागतील. मला आशा आहे की, आपण सगळे या विषयाची गांभीर्याने दखल घ्याल आणि या विषाचे आपल्या देशातून उच्चाटन कराल.
काळा बाजार हा आणखी एक शाप आहे. आपल्याला माहीत आहे की काळा बाजार करणारे लोक फार कमी प्रमाणात पकडले जातात आणि त्यांना शिक्षा केली  जाते. काळा बाजार हा भयंकर राक्षस असून, आपल्या समाजात तो हैदोस घालतो आहे. त्यामुळे आपल्याला अन्नाधान्याच्या टंचाईला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. या प्रश्नाकडे गांभीर्याने दखल घेत, कठोरातले कठोर कायदे आपण बनवले पाहिजे.
पुढचा मुद्दा म्हणजे आपल्याला अनेक गोष्टी वारसाने मिळालेल्या आहेत. जशा चांगल्या गोष्टी मिळाल्या आहेत तशा वाईट गोष्टीे देखील आपल्याला वारशाने मिळालेल्या आहेत. अशीच एक गोष्ट म्हणजे नोकरशाही आणि तिचा भ्रष्ट कारभार. याठिकाणी मला हे प्रकर्षाने अधोरेखित करायचे आहे की, नोकरशाहीचा मनमानी कारभार मी खपवून घेणार नाही. जिथे कुठे  मला असे चित्र दिसेल  तिथे मी कडक कारवाई केल्यावाचून  राहणार नाही.
मला माहीत आहे की काही लोक फाळणीबद्दल, पंजाब आणि बंगालच्या विभाजनाबद्दल खूश नाहीत. बर्याच लोकांनी आपली नाराजी बोलूनसुद्धा दाखवली आहे. परंतु आता जी परिस्थिती आपल्यासमोर आहे ती आपण स्वीकारली पाहिजे. मी मागे म्हटल्याप्रमाणे एकाच द्वीपखंडातील भूभागाची ही फाळणी न भूतो न भविष्यती अशीच आहे. काही लोकांना हेखील आवडलेले नाही की एकाच समुदायातील दोन  घटक वेगळेवेगळे झालेले आहेत. जिथे एक समाज बहुसंख्य आहे तर दुसरा अल्पसंख्याक आहे.
अल्पसंख्याक व बहुसंख्याक यांना घेऊन काम करता येईल की नाही हा प्रश्न लोकांकडून फाळणीच्या अगोदर  विचारला जात होता. आता फाळणी झालेली आहे, आपण विभक्त झालेलो आहोत. मागचे सोडून देत  आपण ती परिस्थिती स्वीकारायला हवी. मला पूर्ण खात्री आहे की, येणार्या काळात आपण घेतलेला निर्णय फायद्याचा  ठरणार आहे. अखंड भारताची संकल्पना कधीही पूर्ण होऊ शकणार नाही. अखंड भारताची संकल्पना ही विनाशाकडे नेणारी संकल्पना आहे. या संकल्पनेचे पुढे काय होईल हे येणारा काळच सांगेल. सोबत एकाच देशात एक समाज प्रभावशाली असणं आणि दुसरा  समाज अल्पसंख्याक असणं हे संयुक्तिक नाही. त्यामुळे आपण फाळणीचा विचार केलेला  होता, तो आता पूर्ण झालेला आहे. पाकिस्तानचे हे विशाल साम्राज्य जर आपल्याला सुखी व समाधानी ठेवायचे असेल तर आपल्याला आपल्या नागरिकांवर लक्ष केंद्रित  करावे लागेल. मुख्यत्वेकरून गरीब जनतेकडे लक्ष दिले पाहिजे. आपण सहकार्याने काम केले , भूतकाळाकडे दुर्लक्ष केले  तर आपल्याला विजय नक्की मिळेल. आपल्याला आपला भूतकाळ विसरून काम करायचे आहे, आपल्या सगळ्यांमध्ये तो उत्साह असला पाहिजे. तेव्हा व्यक्ती कुठल्या  धर्माची आहे, जातीची आहे, रंगाची आहे हे न पाहता आपण काम केले पाहिजे . दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क, अधिकार, असणार आहे. असे असले तरच आपण विकास करू शकू.
हिंदू  समाजव्यवस्था व मुस्लीम समाजव्यवस्था फार वेगळ्यावेगळ्या आहेत असे समजण्याचे कारण नाही. मुस्लिमांमध्येखील आपल्याला पठाण, पंजाबी, शिया, सुन्नी असे पंथ पाहायला मिळतात तर हिंदू समाजात ब्राह्मण, वैष्णव, खत्री, बंगाली, मद्रासी अशा जाती पाहायला मिळतात. हे सगळं संपायला हवं, संपेलही. कोणी म्हणेल की, या व्यवस्थेमुळे भारतीयांना स्वातंत्र्य मिळवण्यात अडथळा आला, म्हणून आपण देखील  या सगळ्या गोष्टी फार अगोदरच सोडायला हव्या होत्या.
फार काळ कोणी तुमच्यावर अधिराज्य गाजवू शकत नाही. 40 करोड लोकसंख्या असलेल्या देशावर  तर नाहीच नाही. आपण पारतंत्र्यात होतो तरी फार काळ आपण त्यांच्या गुलामगिरीत राहू शकलो नाही. आपण यापासून योग्य तो धडा घ्यायला हवा. तुम्ही आता मुक्त आहात. तुमच्या मंदिरांमध्ये  जाण्यास तुम्ही मुक्त आहात. तुमच्या मशिदींमध्ये जाण्यास तुम्ही मुक्त आहात. या पाकिस्तानात हवे तेथे आपले धार्मिक स्वातंत्र्य अबाधित राखण्याचे तुम्हांला स्वातंत्र्य आहे. तुम्ही कुठल्याही वंशाचे असाल किंवा  धर्माचे असाल, तुमच्या स्वातंत्र्यात अधिकारात पाकिस्तानचे सरकार ढवळाढवळ करणार नाही.
तुम्हाला माहिती असेल की, इतिहासात नोंद आढळते की सध्याच्या भारताची परिस्थिती बघता इंग्लंडची परिस्थिती त्याहून दयनीय  होती. रोमन कॅथलिक आणि प्रोटेस्टंट हे ख्रिश्चन धर्माचे दोन  मुख्य पंथ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. आतासुद्धा इंग्लंडमध्ये प्रोटेस्टंट आणि रोमन कॅथलिक  यांच्यात भेदभाव राखला जातो. ईश्वराचे आभार मानले पाहिजेत की अशा विषमतेच्या काळात आपल्याला स्वातंत्र्य मिळाले नाही. आपण सुरुवात केली आहे, जिथे समानता आहे, जिथे धर्माच्या, जातीच्या, वंशाच्या, वर्णाच्या आधारावर कुठेही विषम वागणूक दिली जात नाही. सर्व नागरिक समान आहेत या तत्त्वावर आपण आपल्या देशाची  उभारणी करत आहोत. रोमन कॅथलिक व प्रोटेस्टंट यांच्यातील वादविवाद  मिटवण्यासाठी इंग्लंड सरकारला बराच कालावधी लागला. अनुभवातून हा देश  शिकला व सध्या सर्वांना समान हक्क, समान नागरिकत्व इंग्लंडमध्ये दिले जाते. प्रोटेस्टंट असो किंवा  रोमन कॅथलिक सर्व पंथाचे लोक तेथील नागरिक आहेत. मला वाटते आपण हा आदर्श  घ्यायला हवा. या देशातील  मुस्लीम हे मुस्लीम म्हणून ओळखले जावेत,हिंदू हे हिंदू  म्हणून ओळखले जावेत, केवळ धार्मिक कारणासाठी नाही तर ते या देशाचे नागरिक आहेत व आपले धार्मिक आचरणाचे त्यांचे स्वातंत्र्य अबाधित आहे, हे सांगण्यासाठी आपण तसे केले पाहिजे. असो, मी तुमचा फार वेळ घेणार नाही. मला दिलेल्या  मानाबद्दल, गौरवाबद्दल तुमचे पुन्हा आभार मानतो. मी कायम न्यायाला आणि सकारात्मकतेला आपले तत्त्व मानले आहे.
मी सुचवलेली मार्गर्शक तत्त्वे न्यायाच्या बाजूने आणि अन्यायाच्या विरोधात असतील असे मी ठामपणे सांगू इच्छितो.
Reference: Constituent Assembly Debates.
पूर्व प्रसिद्धी : लोकमुद्रा मासिक, ऑगस्ट 2016

Thursday, 5 January 2017

रात्रं दिस आम्हा युद्धाचे प्रसंग !

माणूस किती जगला याला मोल नाही त्याच्या जगण्याचा मातृभूमीला किती उपयोग झाला याला मोल आहे. मृत्यूनंतर सुद्धा ज्यांच्या स्मृती दुनिया जतन करून ठेवते, ज्यांच्यासाठी आसू ढाळते ते खरे मृत्यूंजय ...
                                                                          जम्मू काश्मीर मधील नागरोटा सांबा सेक्टर येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत पंढरपूरचे शहीद मेजर कुणाल गोसावी हे पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयात असताना एनसीसी विभागात जवळून अनुभवणारी आणि त्यांची महाविद्यालयीन मैत्रीण तेजाली शहासने हिने त्यांच्या काही आठवणींना उजाळा दिला. तिने त्यावर लेख हि लिहले. त्यांच्या मैत्रीत मी हि सामील झालो. आणि तिच्या काही लेखांचा अभ्यास करून मी लेखणी हातात घेतली.
संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या मते त्या हल्ल्यानंतर पाकिस्तान कोमात गेले. हे ऐकण्यास नक्कीच गोड असले आणि तशाच आभासी गोडव्यात रमणे आपल्याकडील समाजमाध्यमांपुरत्या राष्ट्रवाद्यांना पसंत असले, तरी वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. पुन्हा लक्ष्यभेदी हल्ले करा, अशी मागणी लोकप्रिय होत असताना ती वस्तुस्थिती आधी लक्षात घेतली पाहिजे. लक्ष्यभेदी हल्ल्यानंतर भारतावर लहानमोठे २० दहशतवादी हल्ले झाले असून, त्यांत सुमारे २४ जवान शहीद झाले आहेत. नगरोटा तळावरील हल्ला त्यापैकी मोठा. हे नक्कीच दीर्घबेशुद्धीत गेलेल्या देशाचे लक्षण नाही. मात्र स्वत:चेच ढोल वाजवण्यात मश्गूल असलेल्या संरक्षणमंत्र्यांना हे सांगणार कोण? ते निवडणूक प्रचाराच्या सभेत, पाकिस्तानने आमच्याकडे वाकडय़ा नजरेने पाहिले तर त्याचे डोळे काढून हातात देऊ, अशा वल्गना करण्यात मग्न आहेत. हे एक तर मंत्र्यांचे वास्तवापासून तुटणे आहे किंवा तो जनतेला वास्तवापासून तोडण्यासाठी चालविलेला प्रचार आहे. वास्तविक लक्ष्यभेदी हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कर चवताळून अंगावर येणार हे सांगण्यासाठी कोणा थिंकटँकची आवश्यकता नव्हती. त्यासाठी भारतीय लष्कराने सज्ज असणे आवश्यक होते. ही सामान्यज्ञानाची गोष्ट आहे. परंतु तसे झालेले नाही हेच नगरोटा हल्ल्यातून पुन्हा एकदा दिसून आले आहे. असा हल्ला होणार असल्याची पूर्वसूचना गुप्तचरांनी देऊनही तो झाला. तो टाळणे तर दूरच, दहशतवादी सीमेपलीकडून सुमारे ४० किलोमीटर आत येऊन थेट लष्करी छावणीत घुसले. अक्षम्य निष्काळजीपणाखेरीज हे घडणे शक्य नव्हते. या हल्ल्यात दोन अधिकाऱ्यांसह सात जवानांना आपले प्राण गमवावे लागले. त्याची जबाबदारी सुरक्षेबाबतच्या या बेफिकिरीवर असल्याचे मान्य केले, तरच त्यावर उपाययोजना करता येतील. सुमारे अडीच हजार किलोमीटरची भारत-पाक सीमा सीलबंद करणे अशक्यप्राय आहे याबाबत दुमत नाही. परंतु केवळ या नाइलाजावर खापर फोडून चालणार नाही. आधुनिक तंत्रज्ञानामार्फत सीमेवर जागता पहारा ठेवणे ही सुरक्षेसाठीची मूलभूत उपाययोजना. ते करणे दूरच, परंतु आपण आपल्या लष्करी तळांची सुरक्षाव्यवस्थाही अभंग ठेवू शकत नसल्याचे दिसत आहे. उरीमध्ये काही जवान मृत्युमुखी पडले ते तंबूंना दहशतवाद्यांनी लावलेल्या आगीमुळे. सीमेनजीकच्या तळांवरील तंबू किमान अग्निरोधक कापडाचे असावेत याची काळजीही आपण घेऊ शकलो नाही, की अ‍ॅसॉल्ट रायफल, बुलेटप्रूफ जाकिटे अशा जवानांच्या गरजाही भागवू शकलेलो नाही. तेव्हा राष्ट्रवादाच्या लाटेवर स्वार होऊन सरकारला ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही आणि आधीच्या सरकारांची नालायकी पुढे करून आपल्यावरील जबाबदारीही झटकता येणार नाही. परंतु पुन्हा एकदा तसेच प्रकार सुरू असल्याचे दिसत आहेत. देशामध्ये पुन्हा एकदा समाजमाध्यमांतून राष्ट्रवादाचा अतिरेकी ज्वर फैलावला जात आहे.
आधुनिक तंत्रज्ञानामार्फत सीमेवर जागता पहारा ठेवणे ही सुरक्षेसाठीची मूलभूत उपाययोजना. बुलेटप्रूफ जाकिटे, अग्निरोधक तंबू यांची गरज ओळखण्याऐवजी आपण शत्रुराष्ट्र कोमात गेल्याची भाषा करीत आहोत..
अशा सततच्या संघर्षरततेतून नागरिकांना एका आभासी वास्तवाकडे नेण्याचा हा प्रकार असून, सरकारांचे प्रचारी प्रतिपादन आणि ‘खरी’ वस्तुस्थिती यांतील भेद ओळखण्याची क्षमताही लोकांनी गमावल्याचे भयकारी चित्र देशभरात उमटताना दिसत आहे. लष्करी व्यवस्थेने जसे पाकिस्तानी हल्ले रोखण्यासाठी अधिक जागे राहण्याची आवश्यकता आहे, तशीच जागरूकता नागरिकांनीही आभासी वास्तवात वाहून न जाण्यात दाखविली पाहिजे. सीमेवरील जवानांसाठी, देशातील त्यांच्या कुटुंबीयांसाठी तरी आपण एवढे करणे लागतो.
     मेजर साहेब तुम्ही देहाने जरी आम्हाला सोडून गेले असले तरी हृदयात नक्की आहात.
                                                 शहीद मेजर कुणाल गोसावी
                                                                    अमर रहे , अमर रहे !
    
    

Wednesday, 4 January 2017

योगायोग आणि सत्तायोग

भाजपने उत्तर प्रदेश जिंकले तर काय होईल यापेक्षा जिंकले नाही तर काय होईल, हा प्रश्न जास्त महत्त्वाचा ठरणार आहे.
सत्ता हाती असली की अनेक योगायोग साधता येतात. इतकी वर्षे हे असे योगायोग साधण्याचा अधिकार काँग्रेसकडे होता. सध्या आता भाजपची त्यावर मालकी आहे. हे असे करता येते कारण ‘जिसकी लाठी, उसकी भैंस’ ही म्हण भारतीय राजकारणाइतकी अन्य कशालाही लागू होत नाही. म्हणजे सत्तेची लाठी हाती असेल तर सगळ्या म्हशी तुमच्या मागे आपोआप येतात. उदाहरणार्थ निवडणूक आयोग. या आयोगाने बुधवारी उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड, मणिपूर या  राज्यांतील निवडणुकांची घोषणा केली.
तेव्हा वर उल्लेखिलेल्या योगायोगांची मालिका पुढे राहील याची खात्री बाळगलेली बरी. कारण योगायोग आणि सत्तायोग यांचा थेट संबंध असतो. म्हणून उत्तर प्रदेशातील योग हे देशासाठीही महत्त्वाचे ठरणारे आहेत.