तो दिवस येणार म्हणून मी खूप आनंदी होतो .कळल्या पासून उत्सुकता शिगेला पोहचली होती .जुन्नर येथील महाविद्यालयात मला प्रमुख पाहूणा /वक्ता म्हणून बोलावलं होत. व्याख्यानाचा विषय होता "NSS व्यक्तिमत्त्व विकासाचे " हा विषय मला माझ्या NSS मध्ये केलेल्या कामगिरी बद्दल दिला होता.सामाजिक जाणीव, उपेक्षितांचे दुःख ,स्वछता ,आरोग्य, सांस्कृतिक देवाणघेवाण,राष्ट्रीय एकात्मता,नेतृत्व गुण, निर्णय क्षमता ,सक्षमपणा ,असे अनेक गुणसंपदा माझ्यात रुजविण्याच काम गुरुजनांनी केलं .
आणि मी ते आत्मासात करत गेलो, यशस्वी झालो आणि अजून काही बाकी आहे
अनेक शिबिर केली त्यात उत्तम कामगिरी केली माझ्या आई बाबानच तसेच गुरुजनाच महाविद्यालायच नाव मोठं केलं
याचीच पोहोच पावती म्हणून मला बोलावलं होत
पुण्यामधून आधल्या दिवशीच रात्रीच जुन्नर मध्ये तल ठोकून बसलो सकाळी १०.३० वाजता व्याख्यानाची वेळ होती मी वेळेवर पोहोचलो .
स्वागत नहि करोगे हमारा
अशा अविर्भावात गेलो .आणि खुप जोरदार माझं स्वागत केलं गेलं .सर्व विद्यार्थी माझे व्याख्यान ऐकण्यासाठी आतुर झाले होते मीहि आतुर झालो होतो
माझा परिचय झाला
त्यात सांगण्यात आलं
मी आसाम येथे चौदा पंधरा राज्यांचा सुपर सिनियर होतो
मला महाराष्ट्र राज्याचा काव्यरत्न पुरस्कार मिळाला आहे
अनेक शिबीर त्यात मिळालेल यश
सध्या मी ज्ञानदानाचे काम करत असलेल्या शाळेचा उल्लेख तिथे मी मोफत काम करतो
यिन च्या कोअर कमिटी मध्ये सदस्य म्हणून नुकतीच निवड
अजून काय ते अनेक
स्वतः ची लाल करून घ्यायची सवय नाही म्हणून एवढच असो
पुढे मी माईक हातात घेतला आणि माझं काम चालू केलं
खूप गर्दी जमली होती .खूप हसवत होतो
सर्व खळखळून हसत होते
सर्व कसे मजेत चालले होते माझ्या NSS च्या कारकिर्दीचे अनेक किस्से मी सांगत होतो
खुप मुले हसली
पण पाल कुठे तरी चुकचुकत होती हे नक्की ,ती पाल कोणत्या रंगाची हे नेमकं सांगता येणार नाही बाप्पा
शेवटी शेवटी मी काहीतरी अस बोललो कि ,सर्वांला ते पटले आवडले आणि काय देवा माझ्या बरोबर सेल्फी काय माझा मोबाईल नं. किती लोकांनी घेतला .
खूप छान बोललात सर
फेसबुक वर ऑनलाइन आलो तर किती तरी friend रीक्वेस्ट बाप रे
त्या दिवसाचा मी हिरोच होतो
तेव्हा कोणालाच काय वाटलं नव्हत
कोणालाच काय टोचत नव्हत बर टोचत होत तर व्याख्यान झाल्यावर मला बोलून दाखवायचं तरी नेमका मी भारतात आहे की पाकिस्तानात ?
या देशात सार्वजनिक अवकाशात कुणी काय करायचं, कुणी काय करायचं नाही याबाबत अलिखित कायदे असावेत असं वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे. जे आजवर भीषण उन्मादाला, सांस्कृतिक दहशतवादाला बळी पडले आहेत त्यांच्याबद्दल सातत्याने आवाज उठवणाऱ्या माझ्यासारख्या उमद्या नवख्या वर ही वेळ यावी आणि सांस्कृतिक दहशतवादाच्या प्रयोगशाळेत माझा बळी देण्याचा अश्लाघ्य प्रकार व्हावा हे अत्यंत खेदजनक आहे.
सार्वजनिक विश्वात घडणाऱ्या गोष्टींवर सार्वजनिक भाष्य करणं हे इतकं धोकादायक ठरावं?
एका रात्रीत काय होत कोण कोणाला जाऊन मिळत खोटे नाटे आरोप केले जातात
माझ्या काही जवळच्या लोकांचा फोन येतो मला समजावून सांगितलं जात मी खूप विचार केला म्हणून माघार घेतली ते पण तात्पुरती का तर माझ्या जवळच्या लोकांसाठी कदाचित एखाद्या मोठ्या अभ्यासका बद्दल
मोठ्या व्याख्याता बद्दल असे काय घडत असेल तर ठीक आहे पण माझ्या सारख्या बरोबर असे घडणे
ही महाराष्ट्रातली लेटेस्ट लिटमस टेस्ट होती...
पुढची विकेट माझीही असू शकेल ...
मी भयभीत वगैरे होऊन माझे शब्द म्यान करून ठेवेन असं वाटणाऱ्यांना सद्बुद्धि मिळो.
मी मेलेला कोंबडा नाहीये जो मेलेला असल्यामुळे आगीला घाबरत नाही.
मी जिवंत आहे आणि आग काय असते तेही नीट जाणून आहे.
लडाई जारी रहेगी ..
इथल्या लोकशाहीवर माझा नितांत विश्वास आहे आणि 'लडेंगे तोही बचेंगे' असा निर्धार तर आमच्या बापाच्या महाबापाने श्री महाराज शिवरायांनी कधीचाच माझ्यात रुजवला आहे.
जय शिवराय ! जय भारत !
- दीपक राजेंद्र कठाळे
हास्य सम्राट दीपक भाऊ कठडे झकास कार्यक्रम केला वाटत आम्ही आपले फान आधी होतो आणि आत्ता हे आहोत
ReplyDeleteआपला
दगडू(सुमेध आहिरे )
दगडू खूप हसवल....पण काही लोक (श्रोत्यांच्या) कानाला मोठे छिद्र होते
ReplyDeleteते करायला गेले एक आणि झाले भलतेच