भैरवगड केवळ थ रा र क!
मु.पो.(मोरोशी) ता.मुरबाड ,जिल्हा.ठाणे
हजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर! आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर यावी इतकी खोली, सकाळी अकरा वाजताही सूर्यकिरणे अडवली जातील अशा डोंगरांचा शेजार! त्याच्या एका बाजूला सरळसोट भिंत आणि दुसर्या बाजूच्या पोटात कोरलेली वेडीवाकडी कातळवाट! त्या भिंतीखाली थोडंस मोकळं पठार, त्याखाली बर्यापैकी उताराच्या वाटा आणि पायथ्याला वळसा मारून माळशेजकडे जाणारा कल्याण-नगर रस्ता! - भैरवगड या वर्णनापेक्षाही अधिक काहीतरी आहे!
 घरी निवांत सुवर्णपिंपळ नावच पुस्तक वाचत होतो. तेवढ्यात श्री.खरमाळे सर (माजी सैनिक) यांचा फोन आला. दिपक कुठे आहेस तु येतोस का ? जाऊयात भटकंतीला ...मी होकार्थी उत्तर दिल आणि ट्रेकिंग करताना अडचण होणार नाही असे कपडे घातले. (हे पण पहावं लागत नाहीतर चांगल्या चांगल्यानंच्या पँटी फाटल्यात) सरांकडे गेलो आणि पाहतोय तर काय आमच्या सौ.खरमाळे मॅडम (पूर्वीच्या गुंजाळ मॅडम कॉलेज मध्ये मला मराठी विषयाला होत्या.) नर्व्हस होत्या कुठे तरी जायचं होत पण सर काही राजी होत नव्हते असो. पण आम्हाला जायचे होते ठरलेल्या ठिकाणी आणि अचानक सर म्हंटले चल भैरवगड . मी हि आतुर होतो जाण्यासाठी ,मॅडम हि तयार झाल्या मात्र आता मॅडम हसत होत्या . सुशांत ला फोन केला येतोय का ? तोही आला. आम्ही सर्व निघालो जुन्नर - मढ - माळशेज घाट - मोरोशी असा मार्ग निश्चित होता . (दुसरा मार्गच नाही ) खूप मजेशीर गप्पा मारत आम्ही जात होतो. माळशेज घाट उतरून मोरोशी च्या अलीकडे जांभुळ , आवळा विकणारे दिसले. मॅडम म्हंटल्या किती छान जांभळ आहेत ते घेण्यासाठी मागे फिरले. सुशांत आणि मी पुढे गेलो आणि तिथेहि एक जोडपं जांभुळ विक्री करत होते. तिथे बसलो थोडी विचारपूस केली. सरांनी आधी थांबवून भैरवगड दाखवला होता. माझी त्याच्या कडे सारखी नजर जायची. भोकाडी बाबा सारखा वाटायचा. अक्राळ विक्राळ सारखा हसतोय आणि ये ये अस म्हणतोय असा भास वाटायचा. शेवटी मोरीशी आलं. आश्रम शाळेच्या समोर एका घरासमोर एक आजोबा दिसले त्यांना विचारण्यासाठी पुढे सरसावलो तर आजोबांच्या मिशा एखाद्या हरियानाच्या पहिलवाना सारख्या ताव दिलेल्या होत्या. आजोबा सांगायला लागले कुठून कशी वाट जाते.आजोबांची परवानगी घेऊन गाड्या तिथेच पार्क केल्या. वेळ कमी होता म्हणून पटापट आम्ही चौघे निघालो. आंब्याची मोठं मोठी झाड होती. घाली पडलेला आंबा दिसला. मी घेतला पण काय माहित हा कातळात उभा असणारा भैरोबाबा मला रिशवत देत होता आणि मी आंब्याची चव चाखत चाखत चाललो होतो. मस्त अशी प्रतिक्रिया दिली. पण पुढे काय मांडलंय माहिती नव्हत
एक लक्षात आलं सुख भोगलं कि दुःख येते आणि दुःख भोगलं कि सुख. मी सध्या सुख चाखत होतो , दुःख येणार होत हे अटळ होत. चालणे मात्र कोणीच थांबवलं नव्हत. मध्ये सैराट सिनेमा मध्ये दाखवल्या सारखे झाड दिसले सुशांत आणि मॅडम दोघेही बोलले दीप्या जा झाडावर फोटो काढतो मी ऐटीत झाडावर गेलो पण उतरता कुठे येतंय झालो ना पंक्चर कस बस सुशांतचा आधार घेऊन उतरलो. पुढे सर बरेच पुढे गेले होते. मॅडम थकल्या होत्या हे सरांनी ओळखल काही अंतरावरच गड होता. सरांनी मॅडमला इथेच थांब अस सांगितलं पण अनोळखी जागा असल्याने बरोबरीला कोणी तरी हवं यासाठी सर म्हंटले कोण थांबतय. मी नाही म्हंटलो राहिला सुशांत त्याला थांबावच लागलं. सर आणि मी पुढे मार्गस्थ झालो पुढे पुढे अस वाटायला लागलं आयला उगाच आलो मी थांबलो असतो तर बर झालं असत पण सरांच्या पावलावर पाउल ठेवत अविरत चालत राहिलो .
भैरवबाबा भसकन अंगावर आलाय अस वाटत होत खूप भीती वाटत होती पण सर बरोबर होते. मी पण पुरता थकलो होतो. गडाच्या अगदी पायथ्याला दोन गावकरी मुले शिकारीला टेहळणी साठी बसले होते अन्य गावकरी खाली होते आणि दोघे तिघे भाला,कोयता घेऊन जंगलात शिकारीसाठी गुसले होते. थोडा वेळ त्या मुलांजवळ आम्ही दोघे बसलो. गडाबाबतीत विचारपूस केली. त्या मुलांनी सांगितलं पहिलं अवघड आहे एक पायरी अस म्हंटल्यावर मी वर बघितलं. आता सरांना नाही पण म्हणता येत नव्हतं (नाईलाज होता)
सर म्हंटले पुढे तू चल मी एक एक पायरी चढत होतो आणि अचानक एक खांद्या एवढ अंतर असलेली पायरी लागली आणि खाली सटकला तर मोडतोड नक्कीच पण कधीच न बरी होणारी पण माझे शर्थीचे प्रयत्न चालू होतेच.पाठीमागून सर आले. मला क्रॉस करून पुढे जाऊन हँड ग्रीप दिली. पाय नुसते लटलट कापत होते.
" आता मात्र भैरवबाबा हसल्याचा आवाज मला येत होता. आणि म्हणत होता दिपकराव यालाच तर जीवन म्हणतात. तुम्ही येताच मी तुम्हाला गोड आंबा दिला म्हणजे सुख आणि आता जी कसरत करताय ना पाय लटलट कापतायत ना त्याला म्हणतात दुःख " हे सर्व मनातल्या खेळाचे शब्द होते
थोडं पुढे नाही जात तर लगेच खालच्या पायरी पेक्षा मोठ अंतर असलेली पायरी ....पायरी कसली हात सुटला कि हाड वेचावी लागतील अशी भयानक जागा होती . मी पुढे जायच नाही असा निर्णय घेतला आणि सर पुढे गेले बराच वेळ झाला सर खाली येत का नाही. मनातच बोललो ...... चुकले कि काय कुठे देवा भैरवा दृष्टा काय रे चेष्टा करतो. मी खाली हळूहळू उतरत होतो.
वार इतकं होत कि छोटे छोटे दगड खाली पडले कि हवेत तरंगत खाली पडायचे. हे पाहून तर अजून पाय लटलट कापायचे. कसा बसा खाली आलो. थोड्याच वेळात सरांचा आवाज आला.
मन शांत झालं भैरवबाबा कडे पहिले त्याने डोळा मारल्याचा भास झाला आणि मी हि मिश्किलपणे गालातल्या गालात हसलो. संध्याकाळचे सहा वाजले होते. अंधार पडायच्या आत खाली जायचे होते दाट झाडी होती खाली सुशांत आणि मॅडम आमची वाट पाहत होते. आम्ही पुढे पुढे जात असताना अचानक मॅडम आवाज आणि इशारा करत होत्या .पुढे येऊ नका दरी आहे दरी ..........सुशांतने मला फोन केला आणि सूचना केली. everyone will walk either behind us or in front of us असं सोप्पं सूत्र आहे! आम्ही तिरप्या वाटेने खाली उतरण्यासाठी निघालो. पुढे आम्ही चौघे गाड्या जिथे लावल्या होत्या तिथे आलो. सरांनी त्या आजोबांना पैसे दिले. पण जगातला सर्वात सुखी माणूस मला त्या आजोबांमध्ये दिसला. पैशाचा काडीमात्र लोभ नाही. आजोबांचा निरोप घेतला
त्या आधी मी परत एकदा भैरवबाबाकडे पहिले तर ......
डोळ्यासमोर खड्यापारधी सारख रूप दिसलं. माळशेजच्या डोंगररांगांचा राखवालदारच दिसला.
पाहून हसलो आणि घरच्या वाटेन मार्गस्थ झालो.
अशा ट्रेकहून आलो की नेहमीच वाटतं, की 'दिवस चांगला गेला' याचा भटक्यांच्या प्र'चलित' शब्दकोशातला अर्थ असल्या अनुभवांपेक्षा अजून वेगळा काही असेल का ?
(अवांतरः अनुभवांती असे वाटते की, नवख्या ट्रेकरला चढ/उतरताना दिली गेलेली त्याच्या दृष्टीने सर्वात भीतीदायक सूचना ही आहे - "तू जिथे हात ठेवला आहेस तिथे पाय ठेवायला हवा होतास!"
तुमचा
दिप्या

No comments:
Post a Comment